शेअर बाजारात पैसे कमवायचेत? ‘या’ कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी

या IPO साठी 286-288 हा प्राईस बँड निर्धारित करण्यात आला आहे. | Mrs Bectors Food Specialties IPO

शेअर बाजारात पैसे कमवायचेत? 'या' कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 9:26 AM

मुंबई: Cremica या ब्रँडने बिस्कीट बनवणाऱ्या Mrs Bectors Food Specialities ही कंपनी खुल्या भागविक्रीसाठी (IPO) भांडवली बाजारात उतरत आहे. आजपासून गुंतवणुकदारांसाठी या IPO चे सबस्क्रिप्शन घेता येईल. यंदाच्या वर्षातील भांडवली बाजारातील हा 15वा आयपीओ आहे. Mrs Bectors Food ने आतापर्यंत अँकर इन्व्हेस्टर्सच्या माध्यमातून (किमान 10 कोटींची गुंतवणूक करणारे) 162 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. (Mrs Bectors IPO Should you subscribe for listing gains Here’s what analysts say)

या IPO मधून एकूण 540.54 कोटी रुपये उभारण्याचे Mrs Bectors Food चे उद्दिष्ट आहे. एसबीआई कॅपिटल मार्केट्स (SBI Capital Markets), आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities) आणि IIFL Securities या IPO च्या व्यवस्थापक आहेत. या IPO साठी 286-288 हा प्राईस बँड निर्धारित करण्यात आला आहे.

50 शेअर्सचा लॉट

Mrs Bectors Food Specialities च्या एका लॉटमध्ये 50 समभाग असतील. या IPO अंतर्गत 40.54 कोटी रुपयांचे समभाग विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत. तर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून (OFS) 500 कोटी रूपयांचे समभाग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांना 15 रुपयांचा डिस्काऊंट

Mrs Bectors Food Specialities कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक समभागामागे 15 रुपयांची सूट मिळेल. या कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचे समभाग आरक्षित आहेत. IPO नुसार 50 टक्के समभाग क्लालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (QIB) राखीव आहेत. तर रिटेल गुंतवणुकदारांसाठी केवळ 35 टक्के समभाग उपलब्ध आहेत.

ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून कंपन्यांची समभाग विक्री

या IPO मध्ये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून Linus Private Limited 245 कोटी, Mabel Private Limited 38.5 कोटी रुपये, GW Crown PTE Ltd 186 कोटी आणि W Confectionary PTE Ltd कंपनीकडून 30.5 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली जाईल.

यंदाच्या वर्षात भांडवली बाजारात आलेले IPO

यंदाच्या वर्षात भांडवली बाजारात एकूण 15 IPO आले आहेत. यामध्ये SBI Card, Rossari Biotech, Mindspace Business Parks REIT, Route Mobile, Happiest Minds Technologies, Chemcon Speciality Chemicals, Angel Broking, UTI AMC, Mazagon Dock Shipbuilders, Likhitha Infrastructure, Computer Age Management Services, Equitas Small Finance Bank, Gland Pharma, Burger King India या आयपीओंचा समावेश आहे.

संबंधित बातम्या:

Fact check | ‘पीएम निवृत्ती वेतन योजने’तून खरंच 70 हजार रुपये मिळणार?

मोदी सरकार चीनला आणखी एक झटका देणार?; आता आत्मनिर्भर भारत करण्यासाठी आणखी एक पाऊल

बर्गर किंगचे शेअर वाढले, 10 दिवसांत दामदुप्पट

(Mrs Bectors IPO Should you subscribe for listing gains Here’s what analysts say)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.