कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी Steroidsचा मारा, ‘म्युकरमायकोसिस’चा धोका वाढला

स्टेरॉयर्ड्सच्या (Steroids) अति वापर हा म्युकरमायकोसिसचा धोका वाढण्यामागे प्रमुख कारण सांगितलं जात आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात Steroidsचा वापर केला जात आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी Steroidsचा मारा, 'म्युकरमायकोसिस'चा धोका वाढला
म्युकरमायकोसिस
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 6:56 PM

मुंबई : देशात अनेक राज्यात म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजे काळी बुरशीची लागण झालेल्या रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. महाराष्ट्रातही म्युकरमायकोसिसचा धोका वाढलाय. स्टेरॉयर्ड्सच्या (Steroids) अति वापर हा म्युकरमायकोसिसचा धोका वाढण्यामागे प्रमुख कारण सांगितलं जात आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात Steroidsचा वापर केला जात आहे. रुग्णांवरील उपचारासाठी Steroids कधी व कसे घ्यायचे यामागे डॉक्टरांची आपली राय आहे. (Risk of Mucormycosis due to overuse of steroids)

Steroids दिल्यानं Fungal Infection?

एका केसमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या महिलेचा सीटी स्कॅन करण्यात आला. त्यात संबंधित महिलेला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. या महिलेला उपचारादरम्यान Steroids देण्यात आले होते का आणि त्यामुळे तिला म्युकरमायकोसिसची लागण झाली का? याता तपास डॉक्टर करत आहेत.

आयुष्यभर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं

स्टार इमेजिंग लॅबचे संचालक समिर भाटी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या उपचारादरम्यान, अनेक रुग्णांना पहिल्याच दिवशी Steroids घेण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार Steroids ही दुधारी तलवार आहे. कोरोना रुग्णाला ते योग्यवेळी मिळाल्यास तो रुग्ण बरा होऊ शकतो. मात्र, गरज नसतानाही रुग्णाला Steroids दिले जात असेल तर त्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागू शकतात.

गरज नसतानाही Steroids चा वापर

फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयाचे हृदय रोग तज्ज्ञ डॉ. अशोक शेठ यांनी सांगितलं की 80 ठक्के रुग्णांना Steroidsची गरज भासत नाही. भारतात सध्या अनेक कोरोना रुग्ण आहेत जे गरज नसतानाही Steroidsचा वापर करत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 5 ते 7 दिवसानंतरही तुम्हाला ताप येत असेल आणि ऑक्सिजनची गरज भासत असेल. तसंच काही ब्लड टेस्टमध्ये लेवल जास्त प्रमाणात खाली-वर असेल तर Steroids घेतले जावेत. Steroids चे डोस देऊन ते हळू हळू कमी करत बंद केलं जातं.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

म्युकरमायकोसिस या आजाराबाबत ठाकरे सरकारनं मोठी घोषणा केली आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. तशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार बळावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास माणूस दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर योग्य वेळी आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे. या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आल्यामुळे या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ठाकरे सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरी चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 12 रुग्ण दगावले

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

Risk of Mucormycosis due to overuse of steroids

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.