नवी दिल्लीः दिल्लीबरोबरच देशातील 50 हून अधिक प्रसिद्ध मिठाईचे पदार्थ आता मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स (reliance) इंडस्ट्रीजच्या दुकानामधून मिळणार आहेत. त्यासोबतच चॉकलेटसारखी असणारी मिठाई (Sweets) आणि लाडूंची छोटी पाकिटे बनवून विकण्याची योजनाही कंपनीकडून आखण्यात आली आहे. दामोदर मॉलकडून गुरुवारी एका निवेदन काढून ही गोष्ट सांगण्यात आली. प्रसिद्ध आणि पारंपरिक मिठाईही देशभरातील अनेक ग्राहकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
रिलायन्स रिटेल आऊटलेट्सवर उपलब्ध असलेल्या लोकप्रिय मिठाईंमध्ये काळेवा का बेसन लाडू, घसीतारामचा मुंबई हलवा, प्रभूजीचे दरबेश लाडू आणि मेथीचे लाडू, म्हैसूर पाक या पदार्थांचाही यामध्ये समावेश असणार आहे.
पारंपरिक मिठाई एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावण्यासाठी ही योजना असल्याचे रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या रसगुल्लेही आता देशातील अनेक भागातील ग्राहकांना त्याची चव चाखता येणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना ताजी मिठाई मिळावी यासाठी आम्ही पारंपरिक मिठाई विक्रेत्यांसोबतच काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या उद्योगाच्या अंदाजानुसार, भारतीय पारंपरिक पॅकेज्ड मिठाईची बाजारपेठ सध्या सुमारे 4,500 कोटी रुपयांची आहे.
तर पुढील पाच वर्षांत वार्षिक 19 टक्क्यांच्या वाढीसह 13 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यताही रिलायन्सकडून वर्तवण्यात आली आहे.
तर त्याचवेळी इतर प्रकारची मिठाई तयार करणारी बाजारपेठ ही 50 हजार कोटींची आहे असंही त्यांनी स्पष्ट केले.
पारंपरिक मिठाईची विक्री वाढवण्यासाठी रिलायन्सकडून त्यांच्या स्टोअरमध्ये स्वतंत्र युनिट्स सुरू करण्यात आल्या आहेत.
या अंतर्गत रिलायन्स रिटेल मिठाई बनवणाऱ्या युनिट्सना एकत्रित पॅक विकसित करण्यासाठी प्रयत्नशील करण्यात आली आहे.