कोरोना काळात अंबानींची दर्यादिली, ऑईल फॅक्टरीत ऑक्सिजन निर्मिती, मोफत पुरवठा

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) रिफायनरीजमधून रुग्णालयांना विनाशुल्क ऑक्सिजन दिले जाणार आहे. (Mukesh Ambani Sends Oxygen From His Refineries)

कोरोना काळात अंबानींची दर्यादिली, ऑईल फॅक्टरीत ऑक्सिजन निर्मिती, मोफत पुरवठा
मुकेश अंबानी
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 11:32 AM

मुंबई : देशभरात कोरोनाचा दररोज नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या परिस्थितीत रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) रिफायनरीजमधून रुग्णालयांना विनाशुल्क ऑक्सिजन दिले जाणार आहे. (Mukesh Ambani Sends Oxygen From His Refineries For Covid Fight)

सिलेंडरच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यात पुरवठा

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या तेल कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानींच्या गुजरातमधील जामनगरमध्ये दोन रिफायनरी आहे. यात थोडसे बदल केल्यानंतर या ठिकाणी वापरला जाणारा औद्योगिक ऑक्सिजन हा मेडिकलसाठी उपयुक्त ऑक्सिजन म्हणून वापरला जाऊ शकतो. हा ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यात पुरवठा केला जाऊ शकतो.

एकनाथ शिंदेंकडून वृत्ताला दुजोरा

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्सच्या जामनगर कारखान्यातील ऑक्सिजन सिलेंडर ट्रकमध्ये भरुन पुरवठ्यासाठी तयार आहे. या रिफायनगरीतील 100 टन ऑक्सिजन विनामूल्य राज्यात वितरित केले जाईल, अशा विश्वास आहे. महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे रिलायन्स रिफायनरीमधून राज्याला 100 टन ऑक्सिजन मिळणार आहे. (Mukesh Ambani Sends Oxygen From His Refineries For Covid Fight)

उद्धव ठाकरेंचे मोदींना पत्र 

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी राज्यातल्या ऑक्सीजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याबाबत मागणी केली होती.

राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत असून रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. 30 एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या 11.9 लाखापर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे . मागील वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये संपूर्ण देशात सक्रिय रुग्ण 10.5 लाख होते. राज्यात आजमितीस 5.64 लाख सक्रिय रुग्ण आहेत अशा परिस्थितीत वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा चिंतेची बाब आहे.

हवाई मार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याची मागणी 

आज राज्यात 1200 मेट्रिक टन उत्पादनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिल अखेरीपर्यंत ऑक्सिजनची मागणी दिवसाला 2 हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, आम्ही देखील स्थानिक व आजूबाजूच्या ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करीत आहोत. मात्र वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गानी आणि त्यातही प्रामुख्याने हवाई मार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरेंनी या पत्रात म्हटले आहे. (Mukesh Ambani Sends Oxygen From His Refineries For Covid Fight)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी ! आता मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मिती होणार, केंद्र सरकारची परवानगी

Maharashtra Lockdown : राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्या, विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...