मुकेश अंबानींनी घेतले बद्रीनाथचे दर्शन, पूजेनंतर केले पाच कोटींचे दान

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी बद्रीनाथ केदारनाथ धमाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी कोट्यवधींचे दान केले.

मुकेश अंबानींनी घेतले बद्रीनाथचे दर्शन, पूजेनंतर केले पाच कोटींचे दान
मुकेश अंबानी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 9:46 AM

मुंबई,  भारतीय व्यवसायातील कुबेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani Visit Badrinath) यांनी बद्रीनाथ धमाचे दर्शन घेतले. मंदिर समितीकडून मुकेश अंबानी यांचे विशेष स्वागत करण्यात आले. येथे मुकेह्स अंबानी यांनी विशेष पूजा देखील केली. पूजेनंतर त्यांनी मंदिराला पाच कोटींचे दान दिले. बद्रीनाथ येथे अंबानींचे कोकिलाबेन रेस्ट हाऊस आहे. याठिकाणी त्यांनी थोडा वेळ घालविला. त्यानंतर त्यांनी केदारनाथ येथेही भेट दिली व बाबा केदारनाथचे दर्शन घेतले. मुकेश अंबानी यांची बद्रीनाथ केदारनाथवर विशेष श्रद्धा आहे.

मंदिरात केले ध्यान

मुकेश अंबानी आपल्या सहकाऱ्यांसह विशेष विमानाने दर्शनासाठी बद्रीनाथ धामला आले होते. बद्रीनाथ धाममध्ये त्यांचे  मंदिर समितीकडून स्वागत करण्यात आले होते. पूजाअर्चा केल्यानंतर त्यांनी बद्रीनाथ धाम समितीला 5 कोटींचे दान दिले. मंदिर समितीकडून त्यांना बद्री विशालच्या श्रृगांरात असलेली तुळशीची माळ भेट दिली. दर्शन घेतल्यानंतर ते काहीवेळ गर्भगृहात ध्यानासाठी बसले होते.  पूजापाठ झाल्यावर त्यांनी आपले गेस्ट हाऊस कोकिळा निवासलाही भेट दिली. येथे थोडावेळ थांबल्यानंतर त्यांनी केदारनाथला प्रस्थान केले.

हे सुद्धा वाचा

भगवान बद्री विशालवर मुकेश अंबानी यांची अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे ते दरवर्षी बद्रीनाथला दर्शनासाठी येतात. गेल्या महिन्यात खराब वातावरणामुळे त्यांना त्यांचा बद्रीनाथचा दौरा रद्द करावा लागला होता. मुकेश अंबानी यांनी गेल्या महिन्यात आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात पूजा अर्चना केली होती आणि भगवान वेंकटेश्वराच्या पहाडी मंदिरासाठी 1.5 कोटींचे दान दिले होते.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.