श्रीमंतांच्या यादीत अनिल अंबानी 1349 व्या क्रमांकावर, मुकेश अंबानी किती?
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी जगातील श्रीमंताच्या यादीत आघाडी घेतली आहे. फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांनी सहा जणांना मागे टाकत थेट 13 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस पहिल्या क्रमांकावर आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यावेळी पहिल्या क्रमांकावर कायम असल्याचे […]
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी जगातील श्रीमंताच्या यादीत आघाडी घेतली आहे. फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांनी सहा जणांना मागे टाकत थेट 13 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस पहिल्या क्रमांकावर आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यावेळी पहिल्या क्रमांकावर कायम असल्याचे फोर्ब्सने सांगितले. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रामांकावर अनुक्रमे बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांचा क्रमांक आहे.
बेझॉस यांची संपत्ती गेल्या एक वर्षात 19 अब्ज डॉलरने वाढून 131 डॉलर पर्यंत पोहचली आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती 2018 मध्ये 40.1 अब्ज डॉलर होती. ती आता वाढून 50 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत गेल्यावर्षी मुकेश अंबानी 19 व्या क्रमांकावर होते. मात्र यावेळी त्यांनी सहा क्रमांकांना मागे टाकत आघाडी घेत 13 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. दरम्यान या यादीत मुकेश अंबानी यांचा भाऊ अनिल अंबानी 1349 व्या क्रमांकावर आहे.
यापूर्वी 2017 च्या फोर्ब्स यादीत मुकेश अंबानी 33 व्या क्रमांकावर होते. फोर्ब्सच्या यादीत भारतातील 106 अब्जाधीशांमध्ये मुकेश अंबानी हे पहिल्या क्रमांकावर आहेत. विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी 22.6 अब्ज डॉलरसह 36 व्या क्रमांकावर आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी एचसीएलचे सह-संस्थापक शिव नाडर 82 व्या आणि आर्सेलर मित्तलचे चेअरमन आणि सीईओ लक्ष्मी मित्तल 91 व्या क्रमांकावर आहेत.
जागतिक अब्जाधीशांच्या यादीत भारताचे आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला (122 क्रमांक), अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (167 क्रमांक), भारती एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल (244 क्रमांक), पतंजली आयुर्वेदचे सह-संस्थापक आचार्य बालकृष्ण (365 क्रमांक), पीरामल एंटरप्रायझेसचे अध्यक्ष अजय पीरामल (436 क्रमांक), बायोकॉनचे संस्थापक किरण मजुमदार-शॉ (617 क्रमांक), इंफोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती (962 क्रमांक) आणि आरकॉमचे चेअरमन अनिल अंबानी (1349 क्रमांक) या उद्योजकांचा समावेश आहे.