मोहित कंबोज ला मी ओळखत नाही; ते कोण आहेत? : मुख्तार अब्बास नक्वी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या भोंग्यावर जोरदार राजकारण सुरू आहे. यावर येथील प्रत्येक राजकीय पक्ष मैदानात उतरला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या जात आहेत. अशातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी देशातील सर्व हिंदूंना तयारीत रहा अशा आदेशच दिला आहे. तीन तारखेला रमजान आहे. त्यामुळे काही करायचं नाही. पण त्यानंतर […]
नवी दिल्ली : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या भोंग्यावर जोरदार राजकारण सुरू आहे. यावर येथील प्रत्येक राजकीय पक्ष मैदानात उतरला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या जात आहेत. अशातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी देशातील सर्व हिंदूंना तयारीत रहा अशा आदेशच दिला आहे. तीन तारखेला रमजान आहे. त्यामुळे काही करायचं नाही. पण त्यानंतर जर भोंगे उतरले नाहीत तर त्यांना जशास तसं उत्तर देणं आवश्यक असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनीही एक मागणी केली असून ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्याला हात घातला आहे. तसेच त्यांनी मुंबईतील मशिदींवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे हटवले पाहिजेत, असे म्हटले आहे. या मागणीसंदर्भात एक व्हिडिओ ट्विट करून, ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांनी नवीन मोहीम हाती घ्यायला हवी, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यानंतर आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यावर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यात त्यात त्यांनी मोहित कंबोज ला मी ओळखत नाही. ते कोण आहेत? असे म्हटलं आहे.
मोहित कंबोज ला मी ओळखत नाही
मुंबई शहरात मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे हटवले पाहिजेत, अशी मागणी मोहित कंबोज यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केली होती. या मागणीचा पुनरुच्चार कंबोज यांनी केला आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे. मशिदींवरील बेकायदा भोंगे हटवले पाहिजेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे ध्वनी प्रदूषणाविरोधात चांगले उपक्रम राबवत आहेत. मला असे वाटते की, मुंबईत मशिदींवर बेकायदा भोंगे लावले आहेत, ज्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्याचा परिणाम अभ्यास करणारे विद्यार्थी, वयोवृद्ध मंडळींसह अनेकांवर होतो. ते भोंगे हटवले पाहिजेत. पोलीस आयुक्तांनी त्यावर कारवाई केली पाहिजे. मुंबई ध्वनी प्रदूषणमुक्त केली पाहिजे. आम्ही कोणत्याही समाज आणि धर्माविरोधात नाही. अजान झाली पाहिजे, पण ती मशिंदींमध्ये. असे कंबोज म्हणाले होते. त्यावर मोहित कंबोज लाऊडस्पीकर हटविण्याची मागणी करत आहेत. ते कोण आहेत? मोहित कंबोज ला मी ओळखत नाही. असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अधीक विचारले असता त्यांनी जाऊद्या सोडा असे म्हणत विषय संपवला.
तसेच विरोधकांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनावर नक्वी यांनी आपली तिखट प्रतिक्रीया दिली आहे. पंतप्रधान पत्र लिहणारे संप्रदायिकतावादचे प्रोफेशन आणि ट्रॅडिशनल हिस्ट्री शीटर आहेत. यांच्याच शासनकाळात भिवंडीची घटना झाली होती. मेरठ सारखी घटना बिहारमध्ये झाली होती. तर दिल्लीमध्ये शिखांचं नरसंहार होता असेही त्यांनी म्हटले आहे. तर विरोधकांवर हल्ला करताना, यांची समस्या अशी आहे की आता पर्यंत हे स्वतः लोकांना संप्रदायिकताच्या आगीत टाकत होते. पण आता ते यशस्वी होत नाहीत. विरोधकांना आता शांती, सौहाद्रपूर्ण वातावरण आवडत नाही. विरोधकांना वाटत की खून व्हावते दंगली व्हाव्यात.
हिंदू आणि मुस्लिम भेद करता येणार नाही
सध्या देशात सुरू असणाऱ्या हिंसाचारामुळे हिंदू आणि मुस्लिम असा भेद केला जात आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पूर्ण हिंदुस्तान सुरक्षीत आहे. त्यात हिंदू आणि मुस्लिम असा भेद करता येणार नाही. सर्व भारतीय आहेत आणि सर्वांची सुरक्षा महत्वाची आहे. प्रार्थना ही शांततेसाठी असते. लाऊड स्पीकरसाठी कायदा बनवण्यात आला आहे त्याचा सन्मान झाला पाहिजे पालन करण्यात यावे असेही त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्यावर प्रतिक्रीया
महाराष्ट्रात सुरू असलेल्या भोंग्याच्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले, सगळे आप आपल्या परीने कुस्तीबाजी करण्यात व्यवस्त आहेत. लाऊडस्पीकरसाठी कायदा आहे. कुणाला ही तो कायदा मोडता येणार नाही.