उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना कोरोनाची लागण, पत्नीदेखील पॉझिटिव्ह
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांना कोरोनाची लागण झाली आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. तसेच त्यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचा अहवालदेखील कोरोनाबाधित आला आहे. दोघांनाही गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Mulayam Singh Yadav and his wife Sadhana Gupta found corona positive, both are admitted in medanta hospital)
मिळालेल्या माहितीनुसार मुलायमसिंह यादव यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी कोव्हिड चाचणी केली. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचीदेखील कोव्हिड चाचणी करण्यात आली होती. त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दोघांनाही मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेलया काही दिवसांपासून मुलायमसिंह यादव यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुलायमसिंह यादव यांची तब्येत आता बरी आहे. कोरोनाबाधित आढळल्याने त्यांना उपचारांसाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही सातत्याने तिथल्या डॉक्टरांच्या संपर्कात आहोत. वेळोवेळी तुम्हाला माहिती देत राहू.
उत्तर प्रदेशचे अप्पर मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत राज्यात 2778 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर 3736 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत चार लाख एक हजार 306 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 90.24 टक्के इतका आहे. तर राज्यात 36 हजार 898 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत एक कोटी 23 लाख 55 हजार 46 कोव्हिड चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
दरम्यान देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 73 लाख एक हजार 804 इतकी झाली आहे. त्यापैकी 63 लाख 76 हजार 863 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत एक लाख 11 हजार 272 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातमया
जगभरातील 10 कोरोना लस वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात, वर्षअखेर लस येण्याचा WHO चा अंदाज
स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका सर्वाधिक, हयगय करु नका, पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेच्या सूचना
आनंदाची बातमी: भारतात 63 दिवसांत पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट
(Mulayam Singh Yadav and his wife Sadhana Gupta found corona positive, both are admitted in medanta hospital)