मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन होणार साऊंड प्रुफ, मार्गावर 1,75,000 हून अधिक नॉईज बॅरियर्स

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुंबईतील बीकेसी स्थानकाचे काम आणि समुद्राखालील बोगद्याचे काम सुरु आहे. साल 2025 मध्ये बिलीमोरा ते वापी असा बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरु होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन होणार साऊंड प्रुफ, मार्गावर 1,75,000 हून अधिक नॉईज बॅरियर्स
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 1:46 PM

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर नॉईज बॅरियर्स (ध्वनी अवरोधक) बसवण्याचे काम सुरू आहे.आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत. गुजरातमध्ये 1,75,000 पेक्षा जास्त ध्वनी अवरोधक बसवण्यात येणार आहेत. एक किलोमीटर अंतरावर व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूला 2000 ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे एलिवेटेड धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या आवाजाचा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आवाज येणार नाही.

साऊंड प्रुफ नॉईज बॅरियर्स तयार करण्यासाठी तीन प्रीकास्ट कारखाने सुरत, आनंद आणि अहमदाबाद येथे  स्थापन करण्यात आले आहेत. हे ध्वनी अडथळे मार्गाच्या दोन्ही बाजूंना लावण्यात येणार आहेत. दरताशी 320 किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन गाड्यांचा आणि  होणारा आवाज कमी करण्यासाठी ते बसवले जात आहेत.

हे नॉईज बॅरीयर्स ( ध्वनी अडथळे) रेल्वे रुळांपासून 2 मीटर उंच आणि 1 मीटर रुंद काँक्रीट पॅनेल   बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक नॉईज बॅरीयर्स हाअंदाजे 830-840 किलो वजनाचा आहे. हे ट्रेनद्वारे निर्माण होणारा  ध्वनी आणि ट्रेनच्या खालच्या भागातून निर्माण होणारा आवाज, मुख्यतः रुळांवर धावणाऱ्या  चाकांच्या घर्षणातून होणारा आवाज विभागण्यास मदत करतात.

बाहेर निसर्गाचा आनंद घेता येणार

नॉईज बॅरीयर्सचे  डिझाइन अशाप्रकारे केले आहेत की ते बुलेट ट्रेनच्या खिडकीतून बाहेरील दृश्य पाहण्याचा आनंद लुटण्यात हे नॉईस बॅरीयर्स अडथळे आणणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे. निवासी आणि शहरी भागातून जाणाऱ्या वायडक्ट्समध्ये 3 मीटर उंच ध्वनी अडथळे बसवले जातील. 2 मीटर काँक्रीट पॅनेल व्यतिरिक्त, अतिरिक्त 1 मीटर नॉईज बॅरीयर्स  ‘पॉली कार्बोनेट’ आणि पारदर्शक असतील.त्यामुळे खिडकीतून बाहेरील दृश्य आणि निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.