देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी आणि कशी झाली होती?; किती महिने ही प्रक्रिया चालली?
India First Election 1952 and Election Commission : जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातल्या पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया कशी पार पडली? देशातलं पहिलं मतदान कोणत्या राज्यात झालं होतं? किती महिने ही सगळी प्रक्रिया चालली? भारत स्वतंत्र झाल्यानंतरची पहिली निवडणूक, वाचा सविस्तर...
मुंबई | 18 मार्च 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणूक होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा सर्वात मोठा उत्सव सध्या होतो आहे. 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान लोकसभेची निवडणूक होणार आहे. 4 जूनला निकाल समोर होईल. 18 व्या लोकसभेसाठीची ही निवडणूक आहे. पण देशातली पहिली निवडणूक कधी आणि कशी झाली होती? हे माहिती आहे का? ही निवडणूक कशी पार पडली होती? याबाबत जाणून घेऊयात…
देशाची पहिली सर्वात्रिक निवडणूक
15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. लोकशाही व्यवस्था स्विकारल्यानंतर देशात निवडणूका होणार होत्या. 1947 ला जरी आपण स्वतंत्र झालो असलो तरी 1952 साली देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीकडे भारताच्या जनतेसह जगाचं लक्ष लागलं होतं.
देश स्वतंत्र झाल्यानंतर मार्च 1950 साली देशात पहिला निवडणूक आयोग नेमण्यात आला. देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते, सुकुमान सेन… त्यांच्याच नेतृत्वाखाली देशाची पहिली निवडणूक प्रक्रिया पार पडली. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची प्रक्रिया त्यांच्या नेतृत्वात पार पडली.
किती काळ ही प्रक्रिया चालली?
देशात झालेल्या या पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया ही चार महिने चालली. 25 ऑक्टोबर 1951 ही निवडणूक सुरु झाली. फेब्रुवारी 1952 ला देशातील पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. तेव्हा लोकसभेच्या 499 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत जवळपास 17 कोटी नागरिकांनी सहभाग घेतला होता. या निवडणुकीत 45.7 टक्के मतदान झालं.
पहिल्या निवडणुकीचा निकाल काय होता?
देशात पहिल्यांदाच निवडणूक लढली गेली होती. याचा निकाल काय असणार याची उत्सुकता होती. देशाच्या पहिल्या निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतली होती. 45 टक्के मतं काँग्रेसच्या पारड्यात पडली होती. तर निवडणूक आलेल्या उमेदवारांमध्ये 75 टक्के उमेदवार हे काँग्रेसचे होते. या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत 364 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.
कम्युनिस्ट पक्षाने 16 जागा जिंकल्या. त्यातल्या 8 जागा मद्रासमधून निवडून आल्या होत्या. भारतीय जनसंघाने 49 जागांवर उमेदवारी उभे केले होते. त्यातल्या केवळ 3 जागाच त्यांना जिंकता आल्या होत्या.