Vande Bharat Tickets Prices : ‘वंदे भारत’च्या मुंबई-पुणे रूटचे तिकीट सर्वात महागडे, किती आहे किंमत ?
महाराष्ट्राला अनोखी भेट मिळालेल्या दोन वंदेभारतचे मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी उद्घाटन येत्या शुक्रवारी 10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या आलीशान आणि वेगवान वंदेभारतचे तिकीट दर माहीती आहे का ? ते जाणून घ्या
मुंबई : येत्या शुक्रवारी पंतप्रधानांच्या ( NarendraModi ) हस्ते उद्घाटन होणाऱ्या वंदेभारतच्या ( Vande Bharat ) दोन गाड्यांपैकी मुंबई – पुणे वंदेभारत एक्सप्रेसचे तिकीट मुंबई ते पुणे मार्गांवरील इतर सर्व गाड्यांपेक्षा सर्वात महाग ठरणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मुंबई सीएसएमटी ( CSMT ) ते सोलापूर ( SOLAPUR ) नवीन वंदेभारत पुणे मार्गे जाणार आहे. या ट्रेनचा मुंबई ते पुणे प्रवास सर्वात जलद प्रवास ठरणार असून केवळ तीन तासांत पुणे गाठता येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ठ केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 10 फेब्रुवारीला सीएसएमटी ( CSMT ) स्थानकातून दोन वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर ( SOLAPUR ) आणि साईनगर-शिर्डी ( SAINAGAR-SHIRDI ) अशा दोन वंदेभारतचे ( Vande Bharat ) उद्धाटन पंतप्रधानांच्या ( NarendraModi ) हस्ते होणार आहे.
महाराष्ट्राला आणखी दोन वंदेभारतची ( Vande Bharat ) अनोखी भेट मिळाली आहे. मुंबई ते सोलापूर ( SOLAPUR ) आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदेभारतचे उद्घाटन येत्या दहा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( NarendraModi ) यांच्या हस्ते होत आहे. परंतू या गाडीच्या मुंबई ते पुणे चेअरकार ( CC ) प्रवासाचे तिकीट 560 रूपये आणि एक्झुकेटीव्ह चेअरचे ( EC ) तिकीटासाठी तब्बल 1,135 रूपयांना फोडणी बसणार आहे. मुंबई ते पुण्यासाठी ही ट्रेन सर्वात फास्ट ट्रेन ठरणार असून या गाडीने मुंबई ते पुणे केवळ तीन तासांत गाठता येणार आहे. एक ट्रेन मुंबई – पुणे – सोलापूर मार्गावर धावेल तर दुसरी ट्रेन मुंबई – नाशिक – साईनगर शिर्डी मार्गावर धावणार आहे. या दोन्ही ट्रेनची निर्मिती चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीत झाली आहे.
अवघ्या तीन तासांत पुणे गाठणार, तिकीटाचे दरही जास्त
या ट्रेनच्या लॉंचिगपूर्वी आलेल्या बातमीनूसार वंदे भारत ट्रेनचे तिकीट या मार्गांवर धावणाऱ्या सर्व ट्रनेपेक्षा महाग असणार आहे. पुण्याला जाणाऱ्या नव्या वंदेभारतच्या चेअरकारचे तिकीट 560 रूपये तर एक्झुकेटीव्ह क्लासचे तिकीट 1,135 रूपये असणार आहे. ही पुण्यासाठी धावणारी या मार्गावरील सर्वात फास्ट ट्रेन असणार आहे. यामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचे अंतर अवघ्या तीन तासांत संपणार आहे.
शिर्डी पोहचण्यासाठी सहा तास लागणार
टाईम्समध्ये आलेल्या वृत्तानूसार प्रवाशांना शिर्डी पोहचण्यासाठी 6 तास लागणार आहे आणि सोलापूरला जाण्यासाठी 5. 30 ते 6.30 तास लागणार आहेत. तर नाशिकसाठीचे चेअर कारचे भाडे 550 रूपये तर एक्झुकेटीव्ह क्लासचे भाडे 1,150 इतके असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय साईनगर – शिर्डीसाठी चेअरकारसाठी 800 रूपये तर एक्झुकेटीव्ह क्लाससाठी 1,630 रूपये असणार आहे. तसेच सोलापूरसाठी तिकीट दर अनुक्रमे सीसी आणि ईसीकरीता 965 रू. आणि 1,970 रूपये असणार आहे.
सोलापूरला आता 6.35 तासांत पोहचता येणार
मुंबई आणि सोलापूरसाठीची वंदेभारत बोरघाटातून ( पुणे मार्गाने कर्जत – खंडाळा ) जाणार आहे. तर या दोन्ही ठिकाणचे अंतर सुमारे 455 किमी असून हे अंतर 6.35 तासांत कापले जाणार आहे. मुंबई – शिर्डी सेमी हायस्पीड वंदेभारत ट्रेन थळ घाटातून ( कसारा मार्गे ) जाणार आहे. हे अंतर सुमारे 340 किमीचे असून ते 5.25 तासांत कापण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई पोलीसांनी शुक्रवार दि.10 फेब्रुवारीच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईतील बंदोबस्त वाढविला असून मुंबई परीसरात सुरक्षेच्या कारणांवरून ड्रोन, पॅराग्लाईडींग, सर्व प्रकारचे फुगे आणि रिमोटवर उडणाऱ्या हलक्या विमानांवर बंदी घातली आहे.