Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab Murder : पंजाबमध्ये पॉकिट मनी कमी पडतो म्हणून मुलाकडून आई-वडिलांची हत्या

हरमित सिंह याला आईवडिलांकडून दरमहा 18,500 रुपये पॉकिटमनी मिळत असे. मात्र यामध्ये तो नाखूश होता. हे पैसे त्याला वैयक्तिक खर्चासाठी कमी पडत होते. याच रागातून त्याने आई-वडिलांची हत्या घडवून आणली. याप्रकरणी लुधियाना पोलिसांनी आरोपी मुलासह दोघांना अटक केली आहे.

Punjab Murder : पंजाबमध्ये पॉकिट मनी कमी पडतो म्हणून मुलाकडून आई-वडिलांची हत्या
पंजाबमध्ये पॉकिट मनी कमी पडतो म्हणून मुलाकडून आई-वडिलांची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 8:12 PM

लुधियाना : पॉकिटमनी कमी पडत होता म्हणून मुला (Son)ने स्वतःच्या आई-वडिलांची सुपारी देऊन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पंबजामधील लुधियानात उघडकीस आली आहे. भूपिंदर सिंह (65) आणि सुष्पिंदर कौर (62) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर हरमित सिंह असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. हरमित सिंह याला आईवडिलांकडून दरमहा 18,500 रुपये पॉकिटमनी मिळत असे. मात्र यामध्ये तो नाखूश होता. हे पैसे त्याला वैयक्तिक खर्चासाठी कमी पडत होते. याच रागातून त्याने आई-वडिलांची हत्या घडवून आणली. याप्रकरणी लुधियाना पोलिसांनी आरोपी मुलासह दोघांना अटक केली आहे. बलविंदर उर्फ राजू असे अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलीस चौकशीत हरमितने आपला गुन्हा कबूल केला आहे. अन्य दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आई-वडिलांना मारण्यासाठी अडीच लाखांची सुपारी

मयत भूपिंदर सिंह हे भारतीय वायुसेनेतून ऑडिट ऑफिसर पदावरुन निवृत्त झाल्यानंतर एक शाळा चालवत होते. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 50 यार्डांमध्ये घरे बांधून ते विकायचे. हरमितने तीन बेरोजगार युवकांसोबत मिळून आई-वडिलांच्या हत्येचा कट रचला. आरोपी बलविंदर, विकास आणि सुनील हे तिघे आधी हरमितसोबत काम करायचे. मात्र सध्या तिघेही बेरोजगार आहेत. हरमितने आई-वडिलांना मारण्यासाठी अडीच लाख रुपयांची सुपारी या तिघांना दिली होती. मंगळवारी रात्री त्याने या तिघांना आई-वडिलांच्या नकळत घरात घुसवून छतावर लपवले.

उशीने नाक-तोंड दाबून दाम्पत्याची हत्या

भूपिंदर सिंह आणि सुष्पिंदर कौर हे दररोज सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात असत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी उठून ते मॉर्निंग वॉकसाठी तयार झाले. याच दरम्यान बलविंदर, विकास आणि सुनील यांनी दोघांवर हल्ला करत उशीने नाक तोंड दाबले. यातच श्वास गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. यावेळी हरमित सिंह घरातील पहिल्या मजल्यावरील आपल्या खोलीत झोपला होता. हत्येची घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी पोलिसांनी घराच्या आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. मुलानेच आई-वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी मयत दाम्पत्याचा मुलगा हरमित सिंह आणि त्याचा साथीदार बलविंदर या दोघांना अटक केली. तर अन्य दोन साथीदार विकास आणि सुनील हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Murder of parents by a son due to lack of pocket money in Ludhiana Punjab)

हे सुद्धा वाचा

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.