कोलकाता : मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चांडिताला येथे घडली आहे. संजय घोष, बिजली घोष, शिल्पा घोष अशी हत्या करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरुन एकाला अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तपन घोष असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तर श्रीकांत घोष असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. हुगळी जिल्ह्यातील सिंगूरनंतर आता चांडिताला येथे एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चंदिताला येथील नैती भागात संजय घोष हे आपल्या पत्नी व मुलीसह राहत होते. मालमत्तेच्या वादातून आज त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक तथ्य समोर येईल. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस स्थानिक लोक आणि अटक आरोपींची चौकशी करत आहेत.
काही दिवसांपूर्वी हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथील नंदबाजार परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले होते. सिंगूरमध्ये लाकूड तोडण्याचे युनिट चालवणाऱ्या पटेल यांचा नातेवाईक जोगेश धवाणी यांच्यासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याचा आरोप आहे. गुरुवारी सकाळी ध्वनी त्यांच्या घरी आली आणि आम्हाला लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा आम्हाला कुटुंबातील चार सदस्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती. पटेल कुटुंबातील चार सदस्य – 50 वर्षीय दिनेश पटेल, त्यांची पत्नी अनुसुया (45), त्यांचे वडील मावजी (80) आणि त्यांचा मुलगा वाबिक (23) हे घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. मालमत्तेच्या वादातून कुटुंबीयांनीच त्यांची हत्या केली होती. (Murder of three members of the same family in Bengal)
इतर बातम्या
जिचं मुंडकं उडवून जीव घेतला, ती बहीण दोन महिन्यांची गरोदर, वैजापूर हत्या प्रकरणात दोन नवे ट्विस्ट
Pune Crime |पुण्यात भरदिवसा गोळीबार ; 6 गोळ्या झाडत तरुणाची केली हत्या