नवी दिल्लीः जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) खोऱ्यात हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन वातावरण तापल्याचे चिन्हं दिसू लागली आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना भजन आणि मंत्र पठणावरुन जम्मू काश्मिरमध्ये भाजपकडून हिंदुत्व थोपवण्याचा प्रकार केला जात असल्याची टीकाही इस्लामिक संघटना मुत्ताहिद मजलिस-ए-उलेमा (Muttahid Majlis-e-Ulema) यांच्याकडून करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील मुस्लिम मुलांसाठी भजन आणि तसेच हिंदू देवी-देवतांचे मंत्र पठण करण्याच्या मुद्यावरुन निषेध नोंदवण्यात आला आहे.
एमएमयू संघटनेकडून हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवत ही मुस्लिम विद्यार्थ्यांची ही मुस्कटदाबी असल्याचेही सांगण्यात आले आहे.
त्यामुळे इस्लामसाठी हा धोका असल्याचे सांगून संघटनेने या अशा गोष्टीतून काश्मीरमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा रोवला जात असल्याचे मत व्यक्त केले गेले आहे.
जम्मू काश्मिरमध्ये मुत्ताहिद मजलिस-ए-उलेमा या संस्थेच्या 30 धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था काम करत आहेत. या संस्थेने जम्मू-काश्मीरमधील शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही सांगण्यात येत आहे.
काश्मीरमधील शाळांमधून धार्मिक शिक्षणाच्या मुद्यावरुन या संघटनेने हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या संघटनेकडून केंद्रातील मोदी सरकारवरही हल्लाबोल केला आहे.
मुत्ताहिद मजलिस-ए-उलेमा या संघटनेकडून काढलेल्या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे की, शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थेमधील मुस्लिम विद्यार्थ्यांना हिंदू धर्मातील गाणी म्हणण्यास सांगणे, सक्तीने सूर्यनमस्कार घालायला लावणे असे प्रकार येथे केले जात आहेत.
त्यामुळे काश्मीरमध्ये असलेली मुस्लिम अस्मितेला धक्का देण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याची टीकाही केली गेली आहे.
हे प्रकार जम्मू काश्मिरमधील खोऱ्यात घडले जात असल्याने श्रीनगरमधील जामा मशिदीतही बैठक घेण्यात आली आहे. भाजपच्या चालवलेल्या या प्रकारामुळे मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुत्ताहिद मजलिस-ए-उलेमा या संघटनेकडून इस्लामिक शिक्षणाशी संबंधित काढलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की जम्मू काश्मिरला या अशा प्रकारामुळे ज्या प्रकारे ‘संतांची खोरी’ अशी निर्माण झालेली ओळक कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर केला गेला आहे.
त्यामुळे या परिसरातून चालवले गेलेले हे प्रकार त्वरित थांबवावे अन्यथा प्रशासनाची मदत घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल असंही या मुत्ताहिद मजलिस-ए-उलेमा या संघटनेने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो व्हिडीओ जम्मू काश्मिरचा असल्याचे सांगण्यात आले होते. त्या व्हिडीओमध्ये शाळकरी मुले रघुपती राघव राजा राम हे गीत गात होती.
मात्र या गीत गायनावर इस्लामिक धर्मगुरूंपासून ते माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनीही आक्षेप घेतला होता. त्यामुळे या गाण्यावरुन पुन्हा काश्मीर खोऱ्यातील हिंदुत्त्वाचा मुद्दा तापणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.