अवघडय राव, या काळातही तुम्ही बहिष्काराची भाषा बोलताय; देशात शांतता नांदू द्या…

भाजप-आरएसएसचे खासदार देशाच्या राजधानीत उघडपणे मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याची शपथ घेत आहेत.

अवघडय राव, या काळातही तुम्ही बहिष्काराची भाषा बोलताय; देशात शांतता नांदू द्या...
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 7:21 PM

नवी दिल्लीः भाजपकडून सातत्याने देशातील मुस्लिमांबाबत (Muslim) वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. या प्रकारची वादग्रस्त वक्तव्य चालू असतानाच आज भाजप खासदार परवेश वर्मा (BJP MP Parvesh Verma) यांच्या विधानावरून दिल्लीत पुन्हा एकदा वाद वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या प्रकरणी परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी आयोजकांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल केला आहे. या परवेश वर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या प्रकाराबद्दल ओवेसी म्हणाले की, भाजप-आरएसएसचे खासदार देशाच्या राजधानीत उघडपणे मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याची शपथ घेत आहेत.

आणि सरकारकडून कोणतीच कारवाई का केली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रविवारी विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) एका सभेचे आयोजन केले होते.

त्यातच नंद नगरी परिसरात मनीष खून प्रकरण गाजले आहे. यादरम्यान पश्चिम दिल्लीतील भाजप खासदार परवेश वर्मा म्हणाले की, मनीष यांची हत्या जिहाद पसरवणाऱ्यांमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्व हिंदू एक होत नाहीत, तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार असंही ते म्हणाले.

त्यांना सरळ करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्यांच्यावर बहिष्कार टाका असं जाहीर वक्तव्य त्यांनी केले आहे. या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन प्रचंड व्हायरल होत आहेत.

या व्हिडीओमध्ये, भाजपचे परवेश वर्मा यांनी जाहीर कार्यक्रमात सांगतात की, मुस्लिमांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याबद्दल त्यांनी केलेला सवाल त्यामध्ये दिसत आहे.

आपल्या प्रश्नाला ते सहमत आहेत की नाहीत असंही ते विचारत आहेत. त्याही पुढं जाऊन ते सांगतात की, त्यांच्या दुकानांतून तुम्ही काहीही खरेदी करु नका, त्यांना पैसेही देऊ नका हाच त्यांच्यावरचा योग्य उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्लीतील दिलशाद गार्डनमध्ये परवेश वर्मा यांनी ज्या कार्यक्रमात जाहीर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्या कार्यक्रमाचे फुटेज पोलीस तपासत आहेत.

त्याच बरोबर हा कार्यक्रम आयोजीत करताना तशी परवानगी काढली होती का असाही सवाल पोलिस उपायुक्त (शहदरा) आर. यांनी विचारला आहे.

परवेश वर्मा यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केले आहे आणि जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याची तपासणी करुन पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी नंद नगरी भागात मनीषच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. कॅमेरा फुटेजमध्ये तीन तरुण मनीषला चाकूचे वार करुन हत्या करत असल्याचे दिसून येत आहे.

विश्व हिंदू परिषदेने मनीषच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

व्हीएचपीच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष कपिल खन्ना यांनी रविवारी एक निवेदन जाहीर केले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संलग्न संघटनेने उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना सहा कलमी निवेदन दिले. त्यावेळी ठार झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सुरक्षा आणि एका कुंटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची मागणी केली गेली आहे. या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.