“भारतातील मुसलमानांनी घाबरुन जावू नये, तुम्हाला महानतेचा भाव सोडावा लागेल”, मोहन भागवत यांचा सल्ला
सर्वांना सोबत घेऊन पुढं गेलं पाहिजे. आमचं सत्य आणि तुंचं मिथ्य असं आम्ही कधीचं म्हणत नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील मुस्लिमांबाबतीत वक्तव्य केलंय. त्यांनी म्हंटलं की, देशातील मुसलमानांनी घाबरण्याचं कारण नाही. परंतु, तुम्हाला महानतेचा भाव सोडावा लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ऑर्गनारझर आणि पांचजन्य येथील एका मुलाखतीत सविस्तर मत व्यक्त केलं. मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले की, हे सत्य आहे की, देशातील मुसलमानांनी देशातच राहिले पाहिजे. देशातील कोणत्याही मुस्लीमांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मुस्लीमांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पण, मुसलमानांना आपण महान असल्याचं सांगणं सोडून दिलं पाहिजे.
मुसलमांनी हे म्हणणं सोडलं पाहिजे
मोहन भागवत मुसलमांनी संबंधित म्हणाले, आपण एका महान वंशाचे आहोत. या देशावर शासन केलं होतं. या देशावर पुन्हा शासन करू. आपला मार्ग योग्य आहे. आपण वेगळे आहोत. त्यामुळं आपण असंच राहणार. आपण सोबत राहू शकत नाही. मुस्लीमांना असं म्हणणं सोडलं पाहिजे. आपण देशात राहतो. आपण हिंदू आहोत की, कम्युनिस्ट हे सोडून दिलं पाहिजे.
मोहन भागवत म्हणाले, जगातील हिंदूंमध्ये आक्रमकता दिसत आहे. एक हजार वर्षांपासून युद्ध करणाऱ्या समाजात जागृती आली आहे. त्यांनी सांगितलं की, हिंदू समाज एक हजार वर्षांपासून युद्ध करत आहे. ही लढाई परदेशी ताबा, परदेशी प्रभाव आणि परदेशी षडयंत्र या विरोधात राहिली आहे. संघाने याला समर्थन दिलं आहे. दुसऱ्या लोकांचंही याला सहकार्य आहे.
काही लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू समाजाच्या आक्रमकतेमुळं तो जागृत झाला आहे. कित्तेक वर्षांपासून लढत राहिल्यानं आक्रमकता स्वाभाविक आहे.
सर्वांना सोबत घेऊन पुढं गेलं पाहिजे
इतिहासाची गणना सुरू झाली तेव्हापासून भारत अखंड आहे. भावना कमी झाल्या तेव्हा हिंदू विखुरला गेला. त्यांनी म्हंटलं, हिंदू आपली ओळख आहे. आपली राष्ट्रीयता आहे. आपल्या सभ्यतेची विशेषता आहे.
सर्वांना सोबत घेऊन पुढं गेलं पाहिजे. आमचं सत्य आणि तुंचं मिथ्य असं आम्ही कधीचं म्हणत नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात. आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहोत. यासाठी लढाई का बरं. सोबत जाऊया, हे हिंदुत्व आहे.