Nagrota Encounter: दहशतवाद्यांना मोबाईलद्वारे थेट पाकिस्तानमधून सूचना, पुरावे सापडले; पाकिस्तानच्या राजदूतांना समन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत या घटनेची गंभीर दखल घेतली होती. | Nagrota encounter

Nagrota Encounter: दहशतवाद्यांना मोबाईलद्वारे थेट पाकिस्तानमधून सूचना, पुरावे सापडले; पाकिस्तानच्या राजदूतांना समन्स
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 11:44 AM

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या नगरोटा (Nagrota Encounter) येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीसंदर्भात आता खळबळनजक माहिती समोर आली आहे. या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे काही गोष्टी सापडल्या आहेत. यावरून या सगळ्यात पाकिस्तानचा (Pakistan) संबंध असल्याचे ठोस पुरावे भारतीय यंत्रणांच्या हाती लागले आहेत. चकमकीदरम्यान या दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून मोबाईल फोनद्वारे सातत्याने सूचना दिल्या जात होत्या, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे. (Jammu Nagrota encounter phones medicines weapons from Pakistan)

या पार्श्वभूमीवर भारताने आता पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत या घटनेची गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर आज भारताकडून पाकिस्तानच्या राजदूतांना समन्स बजवण्यात आले आहे. या समन्समध्ये नगरोटातील दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी थेट कनेक्शन असल्याचा उल्लेख आहे. या सगळ्याचे पुरावे सादर करून भारताकडून पाकिस्तानची कोंडी केली जाऊ शकते.

भारताला नक्की कोणते पुरावे सापडले? नागरोटा चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून एक डिजिटल मोबाइल रेडियो (DMR) मिळाला. या मोबाईल रेडिओवर पाकिस्तानमधून ‘कहां पहुंचे. क्या माहौल है. कोई मुश्किल तो नहीं है. 2 बजे फिर बता देंगे…’ असे संदेश पाठवण्यात आले होते. त्यामुळे दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील हँडलर्सकडून सूचना दिल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानच्या Q मोबाइल कंपनीचा स्मार्टफोन सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर एक स्मार्टफोन जप्त केला. हा पाकिस्तानातील Q कंपनीचा मोबाइल आहे. दहशतवाद्यांकडे कराचीत तयार करण्यात आलेली काही अँटिबायोटिक आणि युनानी औषधेही मिळाली आहेत. तसेच दहशतवाद्यांच्या पायातील बूटही ‘मेड इन पाकिस्तान’ असल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट?

भारतात येत्या 26 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांचा मोठा घातपात घडवण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे काल (19 नोव्हेंबर) भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार अतिरेक्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट? पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

(Jammu Nagrota encounter phones medicines weapons from Pakistan)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.