श्री रामाशी संबंधीत ठेवले 22 जानेवारीला जन्मलेल्या मुलांचे नाव, इतक्या मुलांचा झाला जन्म
एका अहवालानुसार, 22 जानेवारी रोजी मध्य प्रदेशात 500 हून अधिक मुलांचा जन्म झाला. एकट्या भोपाळमध्ये सुमारे 150 प्रसूती झाल्या. याशिवाय ग्वाल्हेरमध्ये 90, इंदूरमध्ये 35 आणि शिवपुरीमध्ये 33 मुलांचा जन्म झाला आहे. छतरपूरच्या जिल्हा रुग्णालयात 31 महिलांची प्रसूती झाली.
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी पूर्ण झाले. या दिवशी रामलला यांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अनेक गर्भवती महिलांना या दिवशी आपल्या मुलाला जन्म द्यायचा होता. यासाठी अनेक कुटुंबांनी शस्त्रक्रियेची तारीख 22 जानेवारी निश्चित केली होती. अगदी तसेच घडले. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी काही बालकांचा जन्म सामान्य प्रसूतीद्वारे तर काहींचा शस्त्रक्रियेद्वारे झाला. या दिवशी जन्मलेल्या अनेक मुलांची नावे राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या नावावर ठेवली जातात.
इतक्या मुलांचा झाला जन्म
एका अहवालानुसार, 22 जानेवारी रोजी मध्य प्रदेशात 500 हून अधिक मुलांचा जन्म झाला. एकट्या भोपाळमध्ये सुमारे 150 प्रसूती झाल्या. याशिवाय ग्वाल्हेरमध्ये 90, इंदूरमध्ये 35 आणि शिवपुरीमध्ये 33 मुलांचा जन्म झाला आहे. छतरपूरच्या जिल्हा रुग्णालयात 31 महिलांची प्रसूती झाली. यातील अनेक प्रसूती नॉर्मल होत्या, तर अनेक सिझेरियन होत्या. 19 मुले आणि 13 मुलींचा जन्म झाला. एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. राम आणि लक्ष्मण यांचे नाव ठेवण्यात आले. इतर अनेक कुटुंबांनीही आपल्या मुलांची नावे राम आणि सीतेच्या नावावर ठेवली आहेत.
उत्तराखंडमध्ये 250 हून अधिक मुलांचा जन्म झाला
आणखी एका अहवालानुसार, 22 जानेवारीला उत्तराखंडमध्ये 250 हून अधिक मुलांचा जन्म झाला. त्यापैकी सर्वाधिक प्रसूती डेहराडूनमध्ये झाली. डेहराडूनमध्ये प्राणप्रतिष्ठेच्या दिनी 71 नवजात बालके या जगात आली. उधम सिंग नगरमध्ये 55 प्रसूती झाल्या. बागेश्वरमध्ये 6, चमोलीमध्ये 14, चंपावतमध्ये 4, हरिद्वारमध्ये 24, नैनितालमध्ये 24, पौडीमध्ये 17, रुद्रप्रयागमध्ये 13, टिहरीमध्ये 16, उत्तरकाशीमध्ये 9 नवजात बालकांचा जन्म झाला. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अनेक कुटुंबांनी प्रसूतीचे नियोजन केले होते. विशेषत: प्राण प्रतिष्ठाच्या मुहूर्ताच्या दरम्यान म्हणजे 84 सेकंदादरम्यान डिलिव्हरीसाठी मोठी मागणी होती.