Narayan Rane : उद्धव ठाकरेंना जवळून ओळखतो; अंगात कपट आणि खोटारडेपणा, मुख्यमंत्रीपद गेल्यानं व्याकूळ; नारायण राणेंचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या व्यक्तीला मी जवळून ओळखतो. अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवून अडीच वर्षात ना जनतेचे ना शिवसैनिकांचे ना हिंदुत्वाचे भले झाले, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
नवी दिल्ली : ते व्याकूळ झालेत मुख्यमंत्रीपद गेल म्हणून, अशी टीका भाजपा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना मराठी माणूस, हिंदुत्व शिवसैनिक यांची आता आठवण येत आहे. अडीच वर्षात त्यांना हिंदुत्व (Hindutva) आणि मराठी अस्मिता आठवली नाही. सत्ता गेल्यावर तडफडत आहेत, म्हणून त्यांनी व्यथा मांडली. ते व्याकूळ झालेत मुख्यमंत्रीपद गेले म्हणून. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या व्यक्तीला मी जवळून ओळखतो. अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवून अडीच वर्षात ना जनतेचे ना शिवसैनिकांचे ना हिंदुत्वाचे भले झाले, अशी टीका नारायण राणे यांनी केली. एक केविलवाणा प्रयत्न म्हणून मुलाखतीतून व्यथा मांडली, असा हल्ला त्यांनी केला आहे.
‘जखमेवर मीठ चोळण्यासाठी ही मुलाखत’
मी आजारी होतो, माझ्या ऑपरेशन झाले, मी शुद्धीवर नव्हतो आणि त्याचवेळेला सरकार पाडले, असे उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणतात. मात्र पक्षपात उद्धव ठाकरे करायला लागले आणि त्यामुळे त्यांनी दुसरा गट तयार करून शिवसेनेच्याच नावावर ते बाहेर पडले आणि सरकारमध्ये गेले, असे राणे म्हणाले. स्वतःचे पद एकनाथ शिंदेला मिळण्याचा पोटशूळ उठला. यातूनच ही मुलाखत संजय राऊत यांना घ्यायला लावली, असा आरोप त्यांनी केला. संजय राऊत यांनी अजून एक काम हातात घेतले ते पूर्ण करायला लागले आहेत. ते म्हणजे, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवायचे. आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी ही मुलाखत आहे, असे ते म्हणाले.
‘शिंदेंना मारायला सुपारी दिली’
मातोश्री बाहेरच्या एकातरी व्यक्तीला, शिवसैनिकाला तुम्ही त्याची मदत केली आहे का, त्याला प्रेम दिलेत का, विश्वास दिलात का, त्याला उत्तरही नाही तर विश्वास आणि प्रेम सोडूनच द्या. आमदार आता बोलतात, चार चार वर्ष आम्ही यांच्याकडे वेळ मागत होतो, मात्र मिळत नव्हती. एकनाथ शिंदेंना मारायला पण सुपारी दिली होती, असा आरोपही राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
काय म्हणाले नारायण राणे?
‘सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न’
किती मराठी तरुणांना अडीच वर्षात नोकऱ्या लावल्या, असा सवाल केला. पाव डझन खासदार राहिले. संजय राऊतांना लाज कशी वाटत नाही. त्यांच्या पत्रकारितेने शिवसेना वेगळी झाली. काय पाहिले आहे यांनी. मी 1966चा शिवसैनिक आहे. त्यामुळे ही मुलाखत बोगस आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.