Narendra Modi on India | नरेंद्र मोदी यांची पुन्हा विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर सडकून टीका

Narendra Modi On No Confidence Motion | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांची आघाडी इंडिया या नावावरुन तोंडसुख घेत पुन्हा हल्लाबोल केलाय.

Narendra Modi on India | नरेंद्र मोदी यांची पुन्हा विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीवर सडकून टीका
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 7:00 PM

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारविरोधात देशातील सर्व विरोधक एकवटले आहेत. देशातील जवळपास प्रमुख 20 पेक्षा अधिक पक्ष एकत्र आले. काही दिवसांपूर्वी या विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचं यूपीएऐवजी इंडिया (INDIA) असं नामकरण करण्यात आलं. विरोधकांच्या इंडिया या आघाडीच्या नामकरणावरुन नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. लोकसभेत विरोधी पक्षाने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना मोदींनी इंडिया या आघाडीवर टीका केली.

नरेंद्र मोदी म्हणाले….

“अध्यक्षजी, ही इंडिया आघाडी नाही, तर घमंडिया आघाडी आहे. सर्वांना पंतप्रधान व्हायचंय. आपण कोणत्या राज्यात कुठपर्यंत पोहचलोय, हा विचार सुद्धा या आघाडीने केलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये आपण (विरोधकांना उद्देशून) टीएमसी आणि कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात आहात मात्र दिल्लीत एकत्र आहात”, अशी आठवण मोदींनी या इंडिया आघाडीला करुन दिली.

तसेच “गेल्या वर्षी केरळमधील वायनाडमध्ये ज्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड केली त्यांच्यासोबत हे मांडीला मांडी लावून बसले आहेत”, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

हे सुद्धा वाचा

“बाहेरुन लेबल बदलू शकता, मात्र मागील पापांचं काय? हेच पाप तुम्हाला घेऊन जातील.जनतेपासून तुम्ही केलेली पापं कशी लपवणार? ही पापं लपवू शकत नाही”, अशा शब्दात मोदींनी विरोधकांना त्यांच्या कर्मांची आठवण करुन देत टीका केली.

“परिस्थिती विपरीत असल्याने हातात हात घालून (विरोधी पक्ष) एकत्र आहेत. मात्र परिस्थिती बदलल्यावर विरोधक एकमेकांविरुद्ध वाईट होतील”, असंही मोदींनी म्हटलं.

विरोधकांचा सभात्याग

नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर सभागृहाला संबोधित करत होते. याचवेळेस विरोधी पक्षांनी सभात्याग करत लोकसभा सभागृहातून बाहेर पडले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी याआधीही इंडिया आघाडीवर टीका केली होती. “ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिद्दीन यांच्या नावातही इंडिया होतं, असं मोदी भाजप संसदीय पक्ष बैठकीत म्हणाले होते. तसेच “यूपीए हे नाव बदनाम झालं आहे. त्यामुळे आता विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया नाव दिलं आहे. मात्र, विरोधकांची ही आघाडी इंडिया नाही तर घमंडीया आहे”, अशा शब्दात विरोधकांच्या आघाडीची खिल्ली उडवली होती.

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.