Narendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा (Yoshihide Suga) यांना फोन करत भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.(Narnedra Modi invited Yoshihide Suga to visit India)
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा (Yoshihide Suga) यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी आणि योशिहिदे सुगा यांच्यात द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधील व्यापार आणि कोरोना (Covid-19) विषाणू संसर्ग रोखण्यासंबंधी चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट केले आहे.(Narnedra Modi invited Yoshihide Suga to visit India)
दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि जपान यांच्यातील संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. यामुळे सध्याच्या स्थानिक आणि जागतिक पातळीवरिल आव्हांनांशी लढण्यासाठी मदत होणार आहे. भविष्यातील दोन्ही देशांतील संबंध चांगले राहावेत यासाठी पंतप्रधान सुगा यांना भारताची सहकार्याची भूमिका असेल, नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
We agreed that stronger India-Japan ties would help meet the challenges of the current regional and global situation.
I look forward to working with PM Suga to further strengthen our all-round partnership.
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2020
चीनच्या राष्ट्रपतींचाही जपानच्या पंतप्रधांनाना फोन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी देखील जपानच्या नव्या पंतप्रधांनाना फोन केला. मात्र, त्यांच्यामध्ये फारच थोडा वेळ संभाषण झाल्याची माहिती आहे. कोरोना विषाणूचा चीनमधून प्रसार झाल्यानंतर जपान आणि चीनचे संबंध पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजोआबे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान पदी योशिहिदे सुगा यांची निवड झाली आहे.
गलवान खोऱ्यातील झटापटीबद्दल चीनची कबुली
पूर्व लडाखमधील(Ladakh) गलवान खोऱ्यात(Galwan Valley) मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये 15 जूनला झटापट झाली होती. त्या घटनेविषयी चीनने कबुली दिली आहे. एका माध्यमाच्या माहितीनुसार भारतासोबत झालेल्या बैठकीत चीने त्यांचे 5 सैनिक मारले गेल्याची कबुली दिली. यामध्ये एका कमांडिग ऑफिसरचा समावेश होता. यापूर्वी चीने फक्त एक सैनिक मारला गेल्याची कबुली दिली होती.
दरम्यान, गलवानमधील झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीने 5 सैनिक मारले गेल्याची कबुली दिली असली तरी अमेरिकी आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार चीनचे 40 सैनिक मारले गेले होते.
संबंधित बातम्या:
तू खरंच 55 वर्षांचा आहेस? मिलिंद सोमणच्या फिटनेसने पंतप्रधान मोदीही अवाक
मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा!
(Narnedra Modi invited Yoshihide Suga to visit India)