Corona Vaccine : लस स्थानिक पातळीपर्यंत कशी पोहोचवाल? डिटेल प्लॅन द्या, मोदींचे मुख्यमंत्र्यांना निर्देश
"कोरोना लशीचे स्थानिक पातळीपर्यंत वितरण कसे होईल?, लस वितरणाचे नियोजन काय आहे? याचा डिटेल प्लॅन केंद्र सरकारला द्या, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना दिले.
नवी दिल्ली : “कोरोना लशीचे स्थानिक पातळीपर्यंत वितरण कसे होईल?, लस वितरणाचे नियोजन काय आहे? याचा डिटेल प्लॅन केंद्र सरकारला द्या, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना दिले. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्सफरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. ही बैठक दोन टप्प्यात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी मोदींनी वरील निर्देश दिले. (Narendra Modi demands detail action plan of corona vaccine distribution)
देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. गुजरात, दिल्ली, माहाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्सफरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या, प्रतिबंधात्मक उपाय, कोरोना लशीचे वितरण या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यात आली.
वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच कोरोनाशी लढावे लागेल
यावेळी कोरोना लशीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील दोन स्वदेशी लशी आघाडीवर असल्याचे सांगितले. तसेच, “आपल्या सर्वांनाच समाजाची काळजी आहे. मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच कोरोनाशी लढावे लागेल. कोरनासंदर्भात वैश्विक पातळीवर जे नियम आहेत; या नियमांनुसारच आपल्याला समोर जावे लागेल. मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, कोरोना लस स्थानिक पातळीपर्यंत वितरित करण्याच्या योजनेचा सविस्तर आराखडा बनावा. हा आराखडा केंद्राकडे पाठवा. म्हणजे निर्णय घ्यायला आणखी सोपे होईल.” असे मोदी म्हणाले.
कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लस अंतिम टप्प्यात आहेत. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. ते सर्व संशोधकांच्या हातात आहे. पण त्यावरून कुणीही राजकारण करू नये, असा सल्लाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा. हयगय करू नका, असंही त्यांनी सांगितलं.
ही बैठक एकूण 2 टप्प्यांमध्ये घेण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. यात ज्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, ते मुख्यमंत्री सहभागी झाले. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सामील झाले. यावेळी कोरोना लस, कोरोना संसर्ग याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Narendra Modi demands detail action plan of corona vaccine distribution)
संबंधित बातम्या :
कोरोना लशीच्या वितरणासाठी आतापासूनच तयारीला लागा; पंतप्रधान मोदींचे राज्यांना आदेश
कोरोनाची लस कधी येणार हे संशोधकांच्या हातात, राजकारण करू नका; मोदींचा मुख्यमंत्र्यांना सल्ला