Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारने 9 वर्षाचा लेखाजोखा मांडला; भाजप म्हणते, राहुल गांधी यांनी ‘नफरत का मेगा मॉल खोल रखा है’

तुम्ही आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत असून लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकवरही तुम्ही सवाल उपस्थित करत आहात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तुमच्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य कमी होत आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

मोदी सरकारने 9 वर्षाचा लेखाजोखा मांडला; भाजप म्हणते, राहुल गांधी यांनी 'नफरत का मेगा मॉल खोल रखा है'
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 10:53 PM

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकर्त्यांचा अशिक्षित असा उल्लेख भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर त्यांनी थेट हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या अशिक्षित कार्यकर्त्यांना फक्त एवढच सांगतो की, त्यांनी थोडं फार वाचावे आणि नंतर लिहावे. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, अमेरिकेत जाऊन वारंवार मोदी सरकार, भाजप आणि संघावर हल्ला करणाऱ्या आणि ज्या देशाच्या भूमीतून तुम्ही टीका करता. त्या भारताचा विकास दर आणि तुमच्या काळातील विकास दर तुम्हाला माहिती आहे का असा खडा सवाल जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसला केला आहे.

भाजपचे अध्यक्ष नड्डा ही टीका करुन एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनीदोन पावले पुढे जात आम्ही विरोधकांना व्हिजन देऊ शकतो, पण त्यांना व्हिजन कुठून देणार असा खरमरीत सवालही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देशाचा वाढत असणारा विकास आणि देशाचा अभिमान पचवता येत नसल्यामुळेच त्यांच्याकडून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अमेरिकेत टीका करत असतात असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

यावेळी त्यांनी कोरोना काळातील दिवसांची आठवण करुन देत म्हणाले की, कोरोनाबरोबर सगळ्या जगाने लढा दिला, त्यामध्ये आपल्या देशाने वेगळे योगदान दिले असल्याचेही नड्डा यांनी सांगितले.

जेपी नड्डा यांनी राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकान या संकल्पनेवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, “तुम्ही ज्या प्रेमाच्या दुकानाची चर्चा करता पण ते प्रेमाचे दुकान नाही तर ते नफ़रत का मेगा शॉपिग मॉल खोल रखा है अशा शब्दात त्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

चीनने भारतीय जमीन बळकावली आणि भारतीय लष्कराचे चिनी लष्कराबरोबर केलेल्या लढाईच्या नुकसानीवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी सांगितले की, तुम्ही आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत असून लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकवरही तुम्ही सवाल उपस्थित करत आहात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तुमच्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य कमी होत आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

जेपी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या कामाची प्रशंसा केली आहे. तर यूपीएच्या 10 वर्षातील अराजकता आणि घोटाळ्यांबद्दलही त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.