मोदी म्हणतात, फुले जयंतीपासून ते आंबेडकर जयंतीपर्यंत ‘टिकाउत्सव’, वाचा मोदींच्या पत्रातले 10 प्रमुख मुद्दे

नरेंद्र मोदी यांनी लसीकरण उत्सव हे कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या युद्धाची सुरुवात असल्याचं म्हटलं आहे. Narendra Modi Tika Utsav

मोदी म्हणतात, फुले जयंतीपासून ते आंबेडकर जयंतीपर्यंत 'टिकाउत्सव', वाचा मोदींच्या पत्रातले 10 प्रमुख मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 1:24 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील नागरिकांना महात्मा फुले जयंतीपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत देशात लसीकरण उत्सव (Tika Utsav) साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. यानिमित्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले आहे. हे पत्र पंतप्रधान कार्यालयानं ट्विट केलं आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या पत्रात लसीकरण उत्सव हे कोरोना विरुद्धच्या दुसऱ्या युद्धाची सुरुवात असल्याचं मोदी यांनी पत्रात म्हटलं आहे. (Narendra Modi has called the Tika Utsav the beginning of second big war against Corona)

लसीकरण उत्सव कोरोनाविरुद्धचं दुसरं युद्ध

नरेंद्र मोदी यांनी लसीकरण उत्सव हे कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या युद्धाची सुरुवात असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेवर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान कार्यालयाचं ट्विट

ज्येष्ठ नागरिकांची मदत करा

पंतप्रधान मोदी यांनी Each One- Vaccinate One याअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांचं शिक्षण झालेलं नाही त्यांची मदत करा, असं आवाहन केलं आहे.

कोरोनावरील उपचारात मदत

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींना उपचारांसाठी मदत करा. कोरोना विरुद्धच्या लढ्यात ज्यांच्याकडे साधन उपलब्ध नाहीत, त्यांना साधनं उपलब्ध करुन द्या.

मास्कचा वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. मास्क वापरुन स्वत:चं आणि इतरांचं संरक्षण करा, असं मोदी म्हणाले आहेत.

सूक्ष्म कंटेंनमेंट लागू करण्यामध्ये जनतेने नेतृत्व करावं

एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यास जनतेने सूक्ष्म कंटेनमेंट झोन लागू करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. जिथे एखादा व्यक्ती कोरोनाबाधित आढळेल, तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन बनवण्यात यावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.

टेस्टिंग आवश्यक

एक रुग्ण आढळल्यास सूक्ष्म प्रतिबंधित विभाग जाहीर केल्यानंतर इतर नागरिकांनी टेस्टिंगवर भर द्यावा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

लस वाया जाऊ देऊ नका

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आणि लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचा एकही डोस वाया जाऊ देऊ नका, असं आवाहन केलं आहे. आपल्याला झिरो वॅक्सिन वेस्टेजपर्यंत पोहोचायचं आहे, असं मोदी म्हणाले. ज्यांना लसीची आवश्यकता आहे त्यांना लस दिली जावी, असंही ते म्हणाले.

लसीकरणाची क्षमता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची लसीकरणाची क्षमता वाढवून लसीचा ऑप्टिमम युटिलायझेशन वाढवायचं आहे, असं मोदी म्हणाले.

गरज नसताना घराबाहेर पडू नका

देशातील नागरिकांनी ज्यावेळी काम असेल त्यावेळी घराबाहेर पडावे, असं आवाहन केलं आहे. ज्यावेळी गरज नसेल त्यावेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असं नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सांगितलं आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होऊ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या चार दिवसांमध्ये आपण वैयक्तिक पातळीवर, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर कोरोना रोखण्यासाठी स्वत: ध्येय निश्चित करु आणि पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रित करण्यामध्ये यशस्वी होऊ, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या:

VIDEO: पंतप्रधान मोदींची मिमिक्री करणं पुन्हा महागात, कॉमेडियन श्याम रंगीला विरोधात तक्रार दाखल

मास्क न घालणाऱ्या पुणेकरांना धडा, पोलिसांची 2 लाख 28 हजार जणांवर कारवाई

(Narendra Modi has called the Tika Utsav the beginning of second big war against Corona)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.