महत्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवणार; मित्र पक्षांना किती मंत्रिपदं देणार?
Narendra Modi Oath Ceremony BJP Minister List : महत्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी आधी घडामोडींना वेग आला आहे. 47 जण नरेंद्र मोदींच्या घरी दाखल झाले आहेत. इथे महत्वपूर्ण बैठक होत आहे. कुणाला कोणतं खातं मिळणार? वाचा सविस्तर...
आज संध्याकाळी 7. 15 मिनिटांनी एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला अवघे काही तास उरलेले असताना राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. अशात कुणाला कोणतं खातं मिळणार याची देशभर चर्चा होतेय. महत्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवणार आहे, अशी माहिती आहे. गृह, वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत. शिक्षण आणि संस्कृतिक ही मंत्रालय भाजप खासदारांकडे दिलं जाणार आहे. मित्रपक्षांना पाच ते आठ कॅबिनेट पद मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या घरी 47 नेते पोहोचले आहेत. तिथे बैठक होत आहे.
नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचलेले नेते कोण?
अमित शाह
राजनाथ सिंह
नितिन गडकरी
एस जयशंकर
पीयूष गोयल
प्रल्हाद जोशी
जयंत चौधरी
जीतनराम मांझी
रामनाथ ठाकुर
चिराग पासवान
एच डी कुमारस्वामी
ज्योतिरादित्य सिंधिया
अर्जुन राम मेघवाल
प्रताप राव जाधव
रक्षा खडसे
जितेंद्र सिंह
रामदास अठवले
किरेन रिजुजु
राव इंद्रजीत सिंह
शांतनु ठाकुर
मनसुख मांडविया
अश्विनी वैष्णव
बंडी संजय
जी किशन रेड्डी
हरदीप सिंह पुरी
बी एल वर्मा
शिवराज सिंह चौहान
शोभा करंदलाजे
रवनीत सिंह बिट्टू
सर्वानंद सोनोवाल
अन्नपूर्णा देवी
जितिन प्रसाद
मनोहर लाल खट्टर
हर्ष मल्होत्रा
नित्यानंद राय
अनुप्रिया पटेल
अजय टमटा
धर्मेंद्र प्रधान
निर्मला सीतारामन
सावित्री ठाकुर
राम मोहन नायडू किंजरापु
चंद्रशेखर पेम्मासानी
मुरलीधर मोहल
कृष्णपाल गुर्जर
गिरिराज सिंह
गजेंद्र सिंह शेखावत
श्रीपद नायक
सी आर पाटील
‘या’ दोन नेत्यांना संधी नाही
नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळ स्थान दिले जाणार नाही. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे. नारायण राणे एमएसएमई मंत्री होते, तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. मात्र यंदा त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नाही.