PM Modi on Nehru : तुम्ही तर त्यांना लोकशाहीचा चेहरा मानता ना..नेहरुंवर मोदींची नाराजी का?
भाजपला पूर्ण बहुमत मिळाले, भाजपने लोकसभेत 400 जागांचा टप्पा पार केला तर देशाचे संविधान, घटना बदलण्यात येणार असा आरोप विरोधी गोटातून वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे देशातील जनता पण भयभीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे. टीव्ही9 च्या महामुलखातीत मोदींनी घटना बदलाचा दाखल देत पुन्हा नेहरुंवर जळजळीत टीका केली.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. विरोधकांनी दारुगोळा जमा केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी कुरघोडीची संधी सोडलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या सर्व घडामोडींवर देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 शी दिलखुलास चर्चा केली. TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी या चर्चांवर रोखठोक मत मांडलं. टीव्ही9 च्या महामुलखातीत मोदींनी घटना बदलाचा दाखल देत नेहरुविरोधी राग आळवला.
काँग्रेसने संविधानाच्या तोडल्या मर्यादा
पंतप्रधान मोदींनी मुलाखतीत काँग्रेससह देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसने संविधानाच्या मर्यादा तोडल्या. काँग्रेसने अधिकृतरित्या संजीव रेड्डी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवलं होतं. अधिकृतरित्या. त्यानंतर त्यांच्या पाठीत सुरा खूपसून त्यांना पराभूत केलं. गेनचा खेळ आहे. त्यांनी संविधानासोबत नेहमी छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी केला.
नेहरुंवर टीका
नेहरू.एवढे मोठे लोकशाहीचे चेहरा म्हणता ना… संसदेत त्यांनी सर्वात आधी संविधानात दुरुस्ती केली ती फ्रिडम ऑफ स्पीचवर रिस्ट्रिक्शन आणणारं. पूर्णपण अलोकशाहीवादी नेहरूंनी केलं होतं, अशी टीका त्यांनी केली. यापूर्वी पण नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा नेहरुंवर, त्यांच्या धोरणांवर टीका केली आहे.
पाप करायचं असतं तर अगोदरच केलं असतं
पहिली गोष्ट म्हणजे, आज आपल्याकडे किती जागा आहे. आजही एनडीएकडे सुमारे ३६० जागा आहेत, आणि एनडीएच्या व्यतिरिक्त म्हणजे बीजेडी एनडीएत नाही. पण त्यांच्या जागाही गृहित धरल्यास आम्ही ४००च्या पुढे आहोत. गेल्या पाच वर्षापासून आम्ही ४०० जागा घेऊन बसलो आहोत. जर असं पाप कुणाला करायचं असतं तर तेव्हाच केलं असतं. हा तर्क नाही, सत्यही नाही. पण हे का केलं जातंय, कारण त्यांच्याकडे त्यांचा इतिहास पाहा… जे पक्ष काँग्रेस पक्षाच्या संविधानाचे पावित्र्य मानत नाही, तो पक्ष देशाच्या संविधानाला कसं मानणार? काँग्रेस पक्षाच्या संविधानाला नष्ट करण्याचं काम या कुटुंबाने केल्याची टीका त्यांनी केली.
मूळ संविधान आम्ही छापलं
- आता त्यांनी कसं केलं. देशाचं संविधान यात तीन गोष्टी महत्त्वाच्या मला वाटतात. एक तर खूप अनुभवी लोकांनी बसून भारताची नसनस माहीत असलेल्या लोकांनी संविधान तयार केलं. त्यात ती सुगंध आहे. त्यामुळे त्याला सामाजिक दस्ताऐवज म्हणतात. त्यात तो सुगंध आहे. दुसरं म्हणजे हे लोक पुढचा विचार करायचे. त्यात भविष्यात देश पुढे जाईल याची व्यवस्था आहे. तिसरं म्हणजे, ते शब्दात नाही. पण पेटिंग आहे. पहिलं संविधान बनलं. त्याच्या प्रत्येक पानावर पेंटिंग आहे. ती पेंटिंग आपल्याला हजारो वर्षाला जोडणारी एक लिंक आहे. एक साखळी आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपल्या मान्यता या सर्व गोष्टी त्या चित्रात आहे.
- चित्रात यासाठी की देश लवकर समजला जावा. कारण लांबलचक इतिहास लिहायची वेळ येऊ नये. शब्दात वर्तमान आणि येणारा काळ ठेवला गेला आहे. त्यामुळे काल आज आणि उद्या याचा एक संतुलित आणि पवित्र दस्ताऐवज आपलं संविधान आहे. यांनी सर्वात आधी संविधानातील मूळ प्रतमधील देशाच्या परंपरेचा भाव होता तो नष्ट केला. नवीन प्रिंट काढली. त्यामुळे एकही त्या संविधानाची प्रिंट नाही. ज्यावेळी आम्ही संसदेचं अनावर केलं तेव्हा ओरिजिनल प्रिंट आम्ही छापली. कारण माझ्या मनात होते. त्यामुळे जसं सेंगॉल आम्ही संसदेत ठेवलं. तसंच आम्ही ओरिजिनल प्रिंट संसदेत ठेवली, असे मोदी म्हणाले.