Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi on Guarantee : गॅरंटीवर कुणाचा कॉपीराईट? जनतेचा भरवसा असाच मिळत नाही, पंतप्रधानांनी सांगितला हा फॉर्म्युला

Narendra Modi TV9 Exclusive Interview : मोदी गॅरंटी हा लोकसभा निवडणुकीतील परवलीचा शब्द झाला आहे. विरोधकांनी पण विकासाची, झटक्यात गरिबी दूर करण्याची गॅरंटी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी की मोदींची गॅरंटी खरी मानावी असा प्रश्न आहे. टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतीत मोदींनी आपल्या खास शैलीत त्याला उत्तर दिलं...

PM Modi on Guarantee : गॅरंटीवर कुणाचा कॉपीराईट? जनतेचा भरवसा असाच मिळत नाही, पंतप्रधानांनी सांगितला हा फॉर्म्युला
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 10:31 PM

शायनिंग इंडिया, अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार या घोषणांसोबतच मोदी गॅरंटी हा शब्द पण परवलीचा ठरला आहे. विरोधक या शब्दाची खिल्ली उडवत असले तरी गरिबी हटविण्याची, विकासाची त्यांनी पण गॅरंटी दिली आहेच की? १० वर्ष झाली आहे, गॅरंटी देऊ शकतो. मोदींची गॅरंटी आहे. देशासमोर. दुसरीकडे राहुल गांधीही गॅरंटी देत आहे. आमचं सरकार आलं तर एका झटक्यात गरीबी दूर करू असं राहुल गांधी सांगत आहेत. देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न टीव्ही9 च्या महामुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला.

गॅरंटी शब्दावर नाही कॉपीराईट

गॅरंटी शब्दावर माझा कॉपीराईट नाही. प्रत्येकाला त्याचा उपयोग करावा लागतो. ज्यांना बनावट माल विकायचा असतो, ते मोठ्या प्रोडक्टचे शब्द घेऊन प्रचार करतात. तेव्हा त्यांची अडचण ही आहे की त्यांना शब्दाचा वापर करावा लागतो. गॅरंटी अशी मिळत नाही. मोठ्या तपश्चर्येनंतर तुमचे शब्द गॅरंटी बनतात. तुमच्या शब्दाला किंमत मिळते, असा पलटवार मोदींनी काँग्रेसवर केला.

हे सुद्धा वाचा

अन् सांगितला हा किस्सा

मी गुजरातला होतो. अमरोली जिल्ह्यातील काही लोक आहे.. तेव्हा निवडणुका व्हायच्या होत्या. ते मला म्हणाले, फक्त एवढंच बोला. ते गॅरंटी शब्दासाठी आग्रही होते. काम होईल. मी म्हटलं मी नाही बोलणार. ते म्हणाले, साहेब तुम्ही बोलून टाका ना. मी म्हटलं, ज्या गोष्टीची योजना तयार नाही. त्याविषयावर मी बोलणार नाही. ते म्हणाले, तुम्ही बोलला ना, ते रामबाण आहे. तुम्ही बोला. मी त्या दिवसांपासून सजग झालो. गुजरातच्या लोकांच्या मनात माझ्याबद्दलचा हा भाव बनला आहे, सर तुम्हाला एक शब्द बोलायचा आहे.. याचा अर्थ मला आता जबाबदारीने वागलं पाहिजे. तेव्हापासून मी अधिक सजग आणि जबाबदार झालो, असा किस्सा मोदींनी सांगितला.

मला बोलायची गरजच नाही

माझा प्रत्येक शब्द एक जबाबदारी आहे. माझा प्रत्येक शब्द हा एक गॅरंटी आहे. त्या रुपात मी करतो. बाकी लोक तो शब्द वापरत आहेत, त्याबद्दल मी काही बोलत नाही. पण मला सांगा, त्यांचे आजोबा, पणजोबा त्यांचे भाषण ऐका. ते गरीबीवर बोलायचे, त्यांची आजी गरीबीवर बोलायची. त्यांचे वडील गरिबीवर बोलायचे. त्यांची आई जेव्हा रिमोट सरकार चालवायची तेव्हाही गरीबीच्या गोष्टी करत होत्या. आता बोलत आहेत आम्ही एका झटक्यात गरीबी दूर करू. आम्ही फटाफट गरीबी दूर करू. कोण विश्वास ठेवणार? त्यात मोदीला काही बोलण्याची गरज नाही. मला त्यांच्यावर टीका करण्याचीही गरज नाही, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.

हे तर एक सूत्र

पण देश पाहत आहे. त्याच प्रकारे मी म्हटलं मी तुमच्यासाठी मेहनत करणार. त्यावर देशातील कोणताही व्यक्ती माझ्यावर अविश्वास ठेवणार नाही. पण इतर नेत्यांनी मी मेहनत करेल असं सांगितलं तर त्यांच्यावर किती भरोसा करतील. लोकांना सांगावं लागत नाही, लोकांनाच वाटतं मोदी करणार. कारण आपण पाहिलं. मोदी मेहनत करतील हे लोकांना वाटतं. माझं जीवन, माझी वाणी आणि गॅरंटी हे एका सूत्रातून आलंय. ते हवेतून आलेलं नाही. मी जेव्हा सांगतो तेव्हा मी करतो, असे ते म्हणाले.

तरच मिळतो गॅरंटीला भरोसा

2014 मध्ये मी सांगितलं की गरिबांसाठी घरे बनवणार. मला अनेकांनी सांगितलं याला खूप पैसा लागेल. कसं करायचं. मी म्हटलं, बघा देशाच्या इकॉनॉमिचा ड्रायव्हिंग फोर्स बनेल. जेव्हा गरिबांचं घर बनवतो, तेव्हा विट बनवणारा कमावतो, सिमेंट बनवणारा कमावतो, रोजगार मिळतो. फर्निचर बनवणारा कमावतो. मी त्याचं एक चित्र… देशाच्या इकॉनॉमिचा एक आराखडा तयार केला. चार कोटी घर बनवले. दिले. काही राज्य सरकार सरकारचा थंडा रिस्पॉन्स थंडा राहिला. पण अपेक्षेनुसार एवढा कमी नव्हता. त्यानंतर मी पुन्हा घरे देणार म्हणून सांगितलं. बजेटमध्ये सांगितलं. पब्लिक मिटिंगमध्ये बोलतो. तुम्ही जेव्हा निवडणूक प्रचारात जाता तेव्हा माझं काम करा… तुम्ही गावात जाल तेव्हा काही अशी घरे असतील की त्यांना नल से जल योजनेचा लाभ मिळाला नसेल.. कुणाला वीज मिळाली नसेल, कुणाला घर मिळाले नसेल त्यांची यादी मला पाठवा. कारण मी तीन कोटी घरे आणखी बनवणार आहे, ते फक्त त्यांच्यासाठी. म्हणजे पक्का रोडमॅप आहे. तेव्हा कुठे गॅरंटीला भरोसा मिळाला आहे, असे सूत्र त्यांनी सांगितले.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.