ISRO लॉंच करणार जगातला सर्वात शक्तीशाली उपग्रह, अशा प्रकारे जगाला वाचवणार

एकीकडे बदलत्या हवामानामुळे जगाचे तापमान वाढत चालले असताना अनेक ठिकाणचे पर्यावरण बदलत चालले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आपल्या पृथ्वीला नैसर्गिक संकटापासून वाचवण्यासाठी इस्रो आणि नासाच्या मंडळींनी एक शक्तीशाली उपग्रह अंतराळात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ISRO लॉंच करणार जगातला सर्वात शक्तीशाली उपग्रह, अशा प्रकारे जगाला वाचवणार
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 7:18 PM

मानवी इतिहासातला सर्वात ताकदवान सॅटेलाईट NISAR पुढच्या वर्षी लॉंच केला जाणार आहे. या उपग्रहाला भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था NASA यांनी मिळून बनविले आहे. या उपग्रह संपूर्ण जगाला कोणत्याही नैसर्गिक संकटापासून सावध करुन मनुष्यहानी होण्यापासून वाचविणार आहे. हा उपग्रह भूकंप, भूस्खलन, जंगलातील वणवे,चक्रीवादळं, हुरिकेन, अतिवृष्टी, वीज कोसळणे, ज्वालामूखीचा विस्फोट, टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल या सर्वांवर करडी नजर ठेवणार आहे. या संकटाची चाहूल लागताच हा सॅटलाईट आपल्याला सावध करणार आहे.

नासा-इस्रो सिथेंटिक अपर्चर रडार ( NISAR ) लॉंच झाल्यानंतर संपूर्ण जगाला येणाऱ्या भूकंपा संदर्भात हा पहिली माहिती देणार आहे. निसार टेक्टोनिक प्लेट्स मुव्हमेंटला सेंटीमीटरच्या पातळीवर तपासणार आहे.या हालचालीमुळे कुठे जगात भूकंप येणार हे कळू शकणार आहे. हा उपग्रह पृथ्वीला 12 दिवसात एक प्रदक्षिणा घालणार आहे.

निसार सॅटेलाईटचा एक मोठा मुख्य बेस असणार आहे. ज्यात अनेक उपकरणे बसवलेली असणार आहेत. ट्रान्सपोंडर्स, टेलिस्कोप आणि रडार सिस्टीम असेल. यात एक आर्म निघणार आहे. त्याच्यावर एक सिलिंडर असणार आहे. हे सिलिंडर लॉंच झाल्यानंतर काही तासांनी खुलणार आहे. यातून डीश एंटीना सारखी एक मोठी छत्री निघेल. ही छत्री सिथेंटिक अर्पचर रडार आहे.

हे सुद्धा वाचा

दर 12 दिवसांनी पृथ्वीचा नवा रिपोर्ट मिळणार

निसार उपग्रह दर 12 दिवसांनी पृथ्वीला एक प्रदक्षिणा घालणार आहे.एवढ्या दिवसात पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवामान कसे आहे. त्यातील बदल काय आहेत. हे आपल्या अचूकपणे कळणार आहे.त्यामुळे कोणत्या देशात काय हवामान आहे हे कळणार आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटाची आगाऊ सूचना आपल्याला कळणार आहे.

कोठून लॉंच होणार ?

या उपग्रहाचे प्रक्षेपण GSLV-MK2 रॉकेटद्वारे होणार आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटाच्या सतीश धवण स्पेस सेंटरवरुन या प्रक्षेपणाते उड्डाण होणार आहे. या उपग्रहाची आणि पेलोडची अनेक तपासणी झालेली आहे.

काय करणार NISAR ?

हा कृत्रिम उपग्रह नैसर्गिक संकटापासून वाचविणार आहे. हा जगातला सर्वात महागडा अर्थ ऑर्ब्जरव्हेशन सॅटेलाईट आहे.या उपग्रहाला 10 हजार कोटी रुपयांपासून तयार केलेले आहे. कोणत्याही शहरातील भूस्खलन, चक्री वादळ, ज्वालामुखी, भूकंप,ग्लेशियर वितळणे, समुद्री वादळे, वणवे, समुद्राची पातळी वाढविणे यासह अनेक नैसर्गिक संकटाची माहिती हा उपग्रह आपल्याला देणार आहे. निसार उपग्रह अंतराळात जमा होत असलेला कचरा, पृथ्वीच्या दिशेने अंतराळातून येणारे अशनी, वा इतर वस्तू यांच्यावर देखील निसार उपग्रह लक्ष ठेवणार आहे.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...