अंतराळात सृष्टीचा शोध घ्यायला निघालेल्या यानाशी NASA चा 46 वर्षांनी पुन्हा संपर्क, पृथ्वीपासून 20 अब्ज किमी दूर गेल्यावर तुटला होता संपर्क
नासाने अंतराळात वॉयजर-2 हे यान सोडले आहे. साल 1977 मध्ये हे यान अंतराळ प्रवासाला निघाले होते. नासाच्या एका चुकीच्या कमांडमुळे या यानाशी संपर्क तुटला होता.
नवी दिल्ली | 5 ऑगस्ट 2023 : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने आपल्या एका यानाशी तब्बल 46 वर्षांनी संपर्क स्थापन करण्यात यश मिळविले आहे. वॉयजर – 2 हे स्पेसक्राफ्ट सूर्यमालेच्या बाहेर प्रवास करीत आहे. त्याने अनेक नवनवीन रहस्य उघडली आहेत. वॉयजर-2 हे यान 21 जुलैपासून नासाचा संपर्क तुटला होता. या यानाशी पुन्हा संपर्क होईल याची शक्यता खूपच कमी होती. कारण हे यान पृथ्वीपासून तब्बल 19.9 अब्ज किमी अंतरावर आहे. सध्या आपल्या सूर्यमालिकेच्या बाहेर परिभ्रमण करीत आहे.
नासाने अंतराळात वॉयजर-2 हे यान सोडले आहे. साल 1977 मध्ये हे यान अंतराळ प्रवासाला निघाले होते. नासाच्या एका चुकीच्या कमांडमुळे या यानाशी संपर्क तुटला होता. कमांडमुळे या यानाने आपला एंटेना दोन डीग्री फिरविला आणि त्यामुळे संपर्क तुटून अंतराळात हे यान भिरभिरत होते. मंगळवारी एक कमजोर सिग्नल अंतराळातून पृथ्वीवरील नासाच्या कार्यालयात पोहचला. त्यानंतर वॉयजर-2 यानाच्या संपर्कासाठी इंटरस्टेलर शाऊट म्हणजे अधिक ताकदवान सिग्नल पाठविला गेला. त्यामुळे संपर्क स्थापित करण्यात आले.
46 वर्षे जुने आहे वॉयजर-2 यान
ऑक्टोबर महिन्यात वॉयजर स्वयंचलितपणे आपला एंटेना सरळ करणार होता. त्यामुळे नासाला वाटले की ऑक्टोबर आधी त्यांचा यानाशी संपर्क होणार नाही. परंतू इंटरस्टेलर शाऊट पाठवल्यानंतर 37 तासांत मिशन कंट्रोलर्सनी सांगितले की पृथ्वीपासून अब्जो किलोमीटर दूर गेलेल्या आणि अंतराळात हरवलेल्या वॉयजर-2 यानाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला आहे. स्टाफनी सर्वात शक्तीशाली ट्रान्समीटरद्वारे यानाला संदेश पाठविला त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहीली गेली. त्यामुळे वॉयजर-2 आपला एंटेना सरळ करुन पृथ्वीशी आपला संपर्क प्रस्थापित करेल. संपर्क तुटल्यानंतर या यानाकडून कोणताही डाटा मिळत नव्हता असे प्रोजेक्ट मॅनेजर सुजैन डॉड यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले.
सूर्यमालेच्या पल्याड आहे यान
दोन आठवड्यानंतर पुन्हा वॉयजर-2 पासून डेटा मिळू लागला आहे. तसेच हे यान योग्य प्रकारे काम करु लागले आहे. आता ज्या कामगिरीसाठी हे यान पाठविले होते. ते काम पुन्हा सुरु करणार आहे. हे यान हिलीयोस्फेयरच्या पार काम करीत आहे. हे क्षेत्र आपल्या सूर्यमालेच्या बाहेरील आहे. एवढ्या दूर अंतरापर्यंत पोहचणारे हे दुसरे यान आहे. पहीले वॉयजर – 1 साल 2012 मध्ये या अंतरापर्यंत पोहचले होते.