राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर आता फक्त 10 सेकंद वाट पाहावी लागणार, NHAIची नवी नियमावली

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर वाहन चालकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, असा दावा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलाय.

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर आता फक्त 10 सेकंद वाट पाहावी लागणार, NHAIची नवी नियमावली
Toll Plaza
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 9:19 PM

नवी दिल्ली : देशात लांब पल्ल्याचा प्रवास करताना लोक टोल नाक्यांबाबत सतत तक्रार करत असतात. कारण टोल नाक्यांवरील वाहनांच्या गर्दीमुळे त्यांना बराचसा वेळ वाया जात असतो. पण आता राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर वाहन चालकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, असा दावा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलाय. याबाबत NHAI ने दिशानिर्देशही जारी केले आहेत. (NHAI takes steps to ensure waiting time should not be more than 10 seconds at toll plazas)

इतकच नाही तर मोक्याच्या वेळीही टोल नाक्यांवर 10 सेकंदांपेक्षा अधिक वेळ लागणार नसल्याचं NHAI ने म्हटलंय. टोल नाक्यांवर 100 मीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागणार नाहीत. जर कुठल्या कारणांमुळे टोल नाक्यांवर 100 मीटरपेक्षा अधिक रांग लागली तर वाहनांना टोल न भरता टोल नाका पास करण्याची परवानगी दिली जाईल, असंही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटलंय.

100 मीटरवर पिवळी रेष ओढली जाणार

NHAI ने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता प्रत्येक टोल नाक्यावर 100 मीटर अंतरावर एक पिवळ्या रंगात रेष ओढली जाईल. देशातील प्रत्येक टोल नाक्यावर हे चित्र पाहायला मिळेल. NHAI च्या निर्णयामुळे टोक नाक्यांवर लोकांचा वेळ वाया जाणार नाही. तसंच त्यांना टोल भरण्यासाठी जास्त वेळ वाटही पाहावी लागणार नसल्याचं बोललं जात आहे.

वर्षभरात टोलनाके हटवले जाणार- गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मार्चमध्ये लोकसभेत मोठी घोषणा केली होती. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यात येतील. टोलच्या जागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल, असं नितीन गडकरी म्हणाले होते. सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लोक रस्तेप्रवास जेवढा करतील, तेवढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं गडकरींनी नमूद केलं होतं. गडकरींनी मागील सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचं म्हटलं. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

टोलनाकामुक्त देश… काय आहे GPS प्रणाली?

  • रशियन सरकारच्या मदतीने 2 वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार
  • ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएसला अंतिम स्वरूप
  • जीपीएस प्रणालीतून टोल थेट बँक खात्यातून वजा होणार
  • वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल होणार
  • तंत्रज्ञानामुळे पारदर्शक व्यवहार, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य

कसं चालतं जीपीएस (GPS) सिस्टमचं काम?

>> ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम सुमारे 30 उपग्रहांचे नेटवर्क >> 20,000 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरते उपग्रह >> तुम्ही कुठे आणि कोणत्या वाहनासोबत आहात याची अचूक माहिती >> जीपीएस रिसीव्हरकडून सिग्नल रिसीव्ह करुन प्रक्रियेला सुरुवात >> ऑटोमॅटिक घड्याळ्यांच्या माध्यमातून सॅटेलाईटमार्फत माहिती >> जीपीएस प्रणालीच्या आधारे वाहनाच्या हलचालीवरून आकारणार टोल >> कार, नौका, विमान, सेल्युलर फोनमध्ये सिस्टम वापरण शक्य >> 1970 च्या दशकात अमेरिकेकडून जीपीएस प्रणालीचा विकास

संबंधित बातम्या :

टोलनाकामुक्त देश… तुमचा टोल कसा कटणार?

कल्याणमध्ये काटई टोलनाका बंद, शिवसेना-मनसेत श्रेयवाद, राज्य सरकारने नेमका टोलनाका बंद का केला?

NHAI takes steps to ensure waiting time should not be more than 10 seconds at toll plazas

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.