‘नॅशनल हायवे’ला कोणतं नावं हे कसं ठरतं? ‘स्टेट हायवे’ला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा कसा मिळतो? वाचा…

रस्त्यांचं विशाल जाळं असलेल्या जगातील मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. रस्त्यांच्या जाळ्याबाबत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

'नॅशनल हायवे'ला कोणतं नावं हे कसं ठरतं? 'स्टेट हायवे'ला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा कसा मिळतो? वाचा...
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 10:38 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून कानपूर दरम्यानच्या एक्सप्रेस-वेला राष्ट्रीय महामार्गाचा (national highways) दर्जा दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कानपूर-लखनौ एक्सप्रेस-वेला (kanpur lucknow expressway) राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याविषयी उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी मागितली होती. याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिली आहे (National Highways state highways and expressway NH under NHA).

रस्त्यांचं विशाल जाळं असलेल्या जगातील मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. रस्त्यांच्या जाळ्याबाबत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. रस्त्यांच्या जाळ्यात राष्ट्रीय महामार्गाशिवाय राज्य महामार्ग म्हणजेच स्टेट हायवेचीही महत्त्वाची भूमिका असते. भारतात 200 पेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्ग आहेत. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 1 लाख 31 हजार 899 किलोमीटर आहे.

राष्ट्रीय महामार्ग काय आहेत?

राष्ट्रीय महामार्गांना केंद्र सरकारकडून निधी दिला जातो. याच्यावरील नियंत्रक संस्थेचं नाव नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) असं आहे. भारतात महामार्गांची लांबी एकूण 47 लाख 54 हजार किमी आहे. यात राष्ट्रीय महामार्गाचा वाटा केवळ 2 टक्के आहे. असं असलं तरी या 2 टक्के राष्ट्रीय महामार्गांवर एकूण वाहतुकीच्या 40 टक्के भार असतो.

भारतातील सर्वात लांब महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 7 (NH-44) आहे. हा महामार्ग जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर शहराला भारताच्या दक्षिण भागाशी जोडतो हा रस्ता तामिलनाडूच्या कन्याकुमारी शहराला श्रीनगरशी जोडतो. याची लांबी 3 हजार 745 किमी आहे. सर्वात छोटा राष्ट्रीय महामार्ग 44A हा आहे. हा महामार्ग कोचीन ते वेलिंग्टन दरम्यान असून त्याची लांबी 6 किलोमीटर आहे.

महामार्गांची संख्या कशी निश्चित होते?

उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या महामार्गांना सम संख्या दिली जाते आणि पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या रस्त्यांना विषम संख्या वापरली जाते. सर्व प्रमुख महामार्गांसाठी 1 किंवा 2 अंकी संख्येचा उपयोग होतो. या महामार्गांचा क्रमांक तीन अंकी आहे ते रस्ते महामार्गांचे सहाय्यक रस्ते असतात.

कोणता रस्ता राष्ट्रीय महामार्ग होतो आणि कसा?

जर एखाद्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यायचा असेल तर त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवते. हा प्रस्ताव केंद्रीय परिवहन मंत्रालय आणि महामार्ग योजना आयोगाकडे पाठवला जातो. यावर केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय घेऊन मंजूरी देते. हे सर्व झाल्यानंतर राष्ट्रीय राजपत्रातून याबाबत अधिसूचना प्रकाशित केली जाते.

हेही वाचा :

चिअर्स! पर्यटनस्थळं, महामार्गालगतची दारुची दुकानं पुन्हा सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय

भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या

पुण्यात ट्रक चालकाने पाच जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू

National Highways state highways and expressway NH under NHA

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.