Agnipath Scheme : देशसेवा आणि सोबत शिक्षणही; अग्निपथ योजनेत घडणार विद्यार्थी, शिक्षण मंत्रालयाने तयार केला आराखडा

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, शिक्षण मंत्रालय संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून एक विशेष कार्यक्रम सुरू करणार आहे, जेणेकरुन दहावी उत्तीर्ण अग्निवीर सोबतच आपले शिक्षण सुरू ठेवू शकतील.

Agnipath Scheme : देशसेवा आणि सोबत शिक्षणही; अग्निपथ योजनेत घडणार विद्यार्थी, शिक्षण मंत्रालयाने तयार केला आराखडा
Agneepath YojanaImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 10:50 PM

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरून (Agneepath Yojana) देशात तरूण रस्त्यावर उतरले आहेत. तर ते आम्हाला सरळ सैनिक बनू द्या , या योजनेतुन काय साध्य होणार आहे? चार वर्षानंतर आमच काय? असा सवाल विचारत आहेत. तर योग्य उत्तर मिळत नसल्याने देशाच्या मालमत्तेचे नुकसान करत आहेत. आज तरूणांच्या रागाला बिहारमध्ये 3 रेल्वे गाड्या बळी पडल्या. या गाड्या जमावाने पेटवल्या यावरून तरुणांच्या संतापाचा अंदाज येतो. एवढेच नाही तर राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशमध्येही तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. मात्र जी केंद्र सरकारने “अग्निपथ” योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये चार वर्षांसाठी जवानांना अग्निवीर (Agniveer) म्हणून भरती केले जाईल. जे सैन्य दलात सेवा करतील. विशेष म्हणजे अग्निवीर बनून देशसेवा करणाऱ्या या तरुणांना आपले शिक्षण सोडावे लागणार नाही. यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार शिक्षण मंत्रालयाने एक नवीन योजना तयार केली असून त्याअंतर्गत अग्निवीर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) मधून शिक्षण घेऊ शकणार आहे. संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या या परिवर्तनवादी उपक्रमाचे NIOS ने स्वागत केले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ट्विट केले आहे

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, शिक्षण मंत्रालय संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून एक विशेष कार्यक्रम सुरू करणार आहे, जेणेकरुन दहावी उत्तीर्ण अग्निवीर सोबतच आपले शिक्षण सुरू ठेवू शकतील. NIOS कडून 12वीचे प्रमाणपत्र मिळू शकेल. त्यांनी असेही लिहिले आहे की NIOS चा हा कार्यक्रम अग्निपथ योजनेच्या भावनेनुसार असेल, ज्यामुळे अग्निवीरांना पुढील उच्च शिक्षण आणि नोकरी मिळण्यास मदत होईल.

अग्निवीरांना चार वर्षे सेवा करावी लागणार

अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांना सशस्त्र दलात ‘अग्नवीर’ म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे, या योजनेत युवकांना एकूण 4 वर्षे देशसेवेची संधी दिली जाईल, ज्यामध्ये सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असेल. 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची अग्निवीर म्हणून भरती केले जातील. 10वी आणि 12वी उत्तीर्ण युवक यासाठी अर्ज करू शकतील.

अभ्यास चालू ठेवणे सोपे जाईल

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) द्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे अग्निवीरांना त्यांचे शिक्षण सुरू ठेवणे सोपे होईल. अग्निवीर म्हणून निवड झालेल्या 10वी उत्तीर्ण तरुणांना 12वी करण्याची संधी दिली जाईल. जेणेकरून ते चार वर्षानंतर त्यांचा अभ्यास सुरू ठेवू शकतात किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.