लोकसभा अध्यक्ष हुकूमशाहासारखं वागतात, विरोधी पक्षांना…; नवनिर्वाचित खासदाराचे गंभीर आरोप
Balwant Wankhade on Om Birla : काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा अध्यक्ष हुकूमशाहासारखं वागतात, असं बळवंत वानखडे म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना बळवंत वानखडे यांनी मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...
अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभेत बोलत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा माईक बंद करण्यात आला. यावरून बळवंत वानखडे यांनी यांनी लोकसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. लोकसभा अध्यक्ष हुकूमशाहासारखे वागतात. आजसुद्धा त्यांनी सभागृहात विरोधी पक्षाचा हक्क असताना देखील बोलू दिले नाही, असं बळवंत वानखडे यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना बळवंत वानखडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बळवंत वानखडे काय म्हणाले?
सभागृहात कुठली कुठलेही चर्चा करण्यासाठी सभागृहाचे विरोधी पक्षनेते उभे राहतात. परंतु आमचे नेते राहुलची गांधी हे उभे राहिल्या बरोबरच त्यांनी माईक बंद केला. लोकसभा अध्यक्षांनी भाषा सुद्धा योग्य नाही. मी माईक बंद करत आहे असे लोकसभा अध्यक्ष सांगतात. हे अतिशय चुकीचं आणि वेगळा आहे हे अध्यक्ष म्हणून हे शोभा देत नाही कारण अध्यक्षांना हे सभागृह सर्वांना सारखं ठेवण्यासाठी असते परंतु अध्यक्ष हे एका पक्षाच्या कार्यकर्ते सारखे वागतात, असं बळवंत वानखडे म्हणाले.
दूध भुकटी आयात प्रकरणावरही बळवंत वानखडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शेतकऱ्यांची कैवारी आहोत, असे हे सांगतात. परंतु आपल्याला पाहायला जर मिळत असेल. तर मग कांदा असेल सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल किंवा आत्ताची जी भक्तीचा विषय आहे. निर्यात आहे तो सुद्धा त्याबद्दल शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे मिळावेत. म्हणून हा शेतीचा पूर कसा धंदा आहे. परंतु तोही धंदा त्यांनी करू देत नाही. म्हणजे शेतकऱ्यांचा अक्षरशः मरण करत आहे. हे आपल्याला दिसून येईल, असंही बळवंत वानखडे म्हणाले आहेत.
दिल्ली विमानतळावर अपघात प्रतिक्रिया
दिल्ली विमानतळावर आज अपघात झाला. छत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावर बळवंत वानखडेंनी प्रतिक्रिया दिलीय. विमानतळाचे मोठे मोठे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत. ते मॅनेज करूनच दिलेले आहेत. त्यानंतर त्यांचा फार मोठा त्यामध्ये फायदा उद्योगपतींना झाला आहे, असं बळवंत वानखडे म्हणाले.