भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

BJP Leader Chandrashekhar Bawankule on Loksabha Election 2024 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेट घेतली. वाचा सविस्तर बातमी......

भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजपImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 5:58 PM

भाजपच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यात सुधारणा करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने चर्चा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत अनेक नावे गहाळ झाली होती आणि त्याचा भाजपला फटका बसला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, किरीट सोमय्या, अनुप धोत्रे, हेमंत सावरा, आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीतील महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीत काय घडलं?

केंद्रीय निवडणूक आयोगाची आम्ही आज जवळपास सव्वा तास भेट घेतली. महाराष्ट्रातील बूथ आणि मतदार यादी त्यांनी समजून घेतलं. एका लोकसभा मतदार संघात दीड लाख मत 2019 ला होते मात्र ते 2024 ला नाहीत. नागपूरचं उदाहरण आम्ही त्यांना दिलं. डेटा एन्ट्रीची परिस्थिती आम्ही त्यांना समजून सांगितली, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

मतदार यादी ही एका बूथ ची 1 हजार च्या आत करावी अशी विनंती आम्ही केली. वयोवृद्ध मतदार यांचं वय 85 वरून 75 वर्ष करावं अशी विनंती केली. हाउसिंग सोसायटी मधे 100 टक्के बूथ लावण्याची मागणी केली. एकाच इमारतीत 2 बूथ करायचे असतील तर शेजारी शेजारी बूथ लावण्याची आम्ही विनंती केली. आम्हाला वाईट अनुभव आले होते ते पुन्हा येऊ नये, यासाठी 11 मुद्यावर आम्ही चर्चा केली. निवडणूक आयोगाकडून आम्हाला अपेक्षा आहे की निवडणूक चांगली होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

2024 ला गाळलेल्या नावांचा रिव्ह्यू केला पाहिजे. अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली. काही ठिकाणी मतदार यादीत परिवार तुटले आहेत त्यांना एकत्र मतदान करण्याची संधी मिळावी, ही मागणी केलीय. त्यांच्या बोलण्यावरून अस दिसतंय की बूथ लेव्हलच्या अधिकाऱ्यांकडून चुका झाल्याचं दिसतं. महाराष्ट्रात 10 टक्के लोकांना मतदान करता आलं नाही. फोटो नसल्यामुळे अनेकांना मतदान करता आलं नाही, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.