काल केजरीवाल यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे आज दोन बड्या नेत्यांना भेटणार; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
Uddhav Thackeray Meets Arvind Kejriwal : इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक; उद्धव ठाकरे दिल्लीत, 'या' नेत्यांना भेटणार. आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीआधी राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. वाचा सविस्तर...
प्रदिप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे. अशात देशातील विरोधीपक्षांच्या आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. राजधानी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीला इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीसाठी कालच दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीआधी ते काही नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकी आधी ठाकरे महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत.
केजरीवाल यांची भेट
काल संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, आदित्य ठाकरे, प्रियांका चतुर्वेदी ही नेते मंडळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत होती. तर आपचे नेते राघव चड्डा हे देखील या भेटीवेळी उपस्थित होते. या भेटीचे फोटो उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहेत.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री @ArvindKejriwal ह्यांची भेट घेतली. pic.twitter.com/nN3WzgeN55
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 18, 2023
ठाकरे आज दोन नेत्यांना भेटणार
काल अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आज दोन महत्वाच्या नेत्यांना भेटणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची उद्धव ठाकरे आज भेट घेतील. आज दुपारी दीड वाजता ही भेट होईल. तर दुपारी 12 वाजता सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत.
भेटींचा सिलसिला
इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी केजरीवाल यांचा बैठकांचा सिलसिला सुरु आहे. आज सकाळी दहा वाजता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट होणार आहे. काल केजरीवाल यांची उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्याशी झाली चर्चा होती.
आज राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 3 वाजता हॉटलमध्ये नेते या बैठकीसाठी अशोक हॉटेलमध्ये दाखल होतील. उद्धव ठाकरे बैठकीसाठी कालच दाखल झाले आहेत. ते आज काही नेत्यांना भेटत आहेत. उद्धव ठाकरे यांची आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद होणार आहे.