उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा; म्हणाले, नरेंद्र मोदी यांनाही…
Uddhav Thackeray on PM Narendra Modi and Devendra Fadnavis : शिवराज सिंह यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांनाही बदललं जाऊ शकतं, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दिल्लीत पत्रकारांशी उद्धव ठाकरे बोलतो होते. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. वाचा सविस्तर...
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज राजधानी दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवराज सिंह यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांनाही बदललं जाऊ शकतं, असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच इंडिया आघाडीच्या बैठकीवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
भाजपवर निशाणा
भाजपकडून इंडिया आघाडीवर टीका केली जात आहे. विरोधी पक्षातील सर्व नेते हे स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. होय आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या देशाचं हित हा आमचा स्वार्थ आहे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“होय, आमचा स्वार्थ आहे”
देशाची लोकशाही हाच आमचा स्वार्थ आहे. त्यांचं काय करायचं ते त्यांनी करावं. जसं मध्य प्रदेशात शिवराज सिंह यांना बदललं गेलं. तसं नरेंद्र मोदींना पण बदलू शकतात. आज नाही तर उद्या जागा वाटप करावंच लागेल. त्यालाठी मी अनेकांना भेटेल. थंडी वाजते म्हणून मी स्वेटर घातला आहे. पण मी काही हुडी वगैरे घालून मी भेटणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
इंडिया आघाडीच्या बैठकीवर ठाकरे म्हणाले…
बऱ्याच दिवसांनी मी दिल्ली आलोय. आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. अनेक मुद्यांवर आज चर्चा होईल. आता निवडणुकीच वर्ष सुरू होत आहे. त्यासाठी रणनीती ठरेल. आघाडीला कोणीतरी निमंत्रक असावा. त्यासाठी चेहरा ठरवता येतो का हे ठरवावं लागेल, असं ठाकरे म्हणाले.
लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारत दोन तरूणांनी धुडगूस घातला. यानंतर संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आलं. यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. निवडणुकीत काय करायचं यावर बैठकीत चर्चा होईल. सत्यपाल मलिक यांना मी पहिल्यांदा भेटत आहे. बघू काय होतं ते… अदानी हा माझ्या मुंबईचा विषय आहे. तो इंडिया आघाडीचा विषय नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.