दादा भुसे यांच्यावर संजय राऊत पुन्हा कडाडले, मी खुलासा मागितला, त्यांच्या दाढीला आग लागण्याचं काम नव्हतं, नवा हल्लाबोल काय?

मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत असतांना मातोश्रीची भाकरी खाऊन शरद पवार यांची चाकरी करतात असं म्हंटलं होतं. त्यावरून संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

दादा भुसे यांच्यावर संजय राऊत पुन्हा कडाडले, मी खुलासा मागितला, त्यांच्या दाढीला आग लागण्याचं काम नव्हतं, नवा हल्लाबोल काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 5:17 PM

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यावरुन मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. दादा भुसे यांनी टीका करत असतांना माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करा जर आरोप सिद्ध झाले तर राजकीय निवृत्ती घेईल असं म्हंटलं होतं. त्यावरून संजय राऊत यांच्यावर टीका करत असतांना दादा भुसे यांनी संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा, ते आमच्या मतांवर निवडून आलेले महागद्दार आहे. मातोश्रीची भाकरी खाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांची चाकरी करतात अशी जहरी टीका केली होती.

दादा भुसे यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. यामध्ये संजय राऊत म्हणाले दादा भुसे यांच्या दाढीला आग लागण्याचे कारण काय, मी आरोप नाही केला मी खुलासा मागितला होता. शेतकरी खुलासा मागत आहेत भुसे यांनी शेतकऱ्यांकडून 175 कोटी रुपये गोळा केले आहे.

मी खासदार यांच्यामुळे झालेलो नाही, मला त्या वेळच्या शिवसेना आमदारांनी निवडून दिल आहे. तुम्हाला कोणी मतं दिली, तुमची मतं आकाशातून पडली का आता निवडून येऊन दाखवा असे म्हणत संजय राऊत यांनी दादा भुसे यांना आव्हान दिले आहे.

हे सुद्धा वाचा

ही माझी दिल्ली देण्याची पहिली वेळ नाही मी चौथ्यावेळी खासदार झालो आहे. त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये. मला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी चार वेळेस दिल्लीत पाठविले आहे असेही स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

तुम्ही उद्धव ठाकरे यांचे असताना नरेंद्र मोदी आमचा बाप आहे म्हणता याचे उत्तर द्या असं संजय राऊत म्हणाले आहे. एकूणच दादा भुसे यांनी केलेल्या आरोपावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून ट्विट केले होते.

मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर विधानसभेत आज आपली बाजू मांडली. यामध्ये त्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडण करत संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली होती. यामध्ये थेट आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीच नाहीतर राजकीय जीवनातून निवृत्त होईल असेही मंत्री दादा भुसे यांनी म्हंटलं होतं. त्यात संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खाऊन शरद पवार यांची चाकरी करतात असे म्हंटले होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.