‘श्रीमंताच्या घरातील कावळाही मोर वाटतो’, नवज्योत सिद्धूंच्या ‘बॅटिंग’ने मोदी सरकारची कोंडी, ट्विटरवर घमासान

नवज्योत सिद्धू यांनी शेतकरी आंदोलन आणि त्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपल्या खास शेरोशायरीच्या अंदाजात भाष्य केलंय.

'श्रीमंताच्या घरातील कावळाही मोर वाटतो', नवज्योत सिद्धूंच्या 'बॅटिंग'ने मोदी सरकारची कोंडी, ट्विटरवर घमासान
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 11:51 PM

नवी दिल्ली : आक्रमक शेरोशायरी आणि सडेतोड बोलणारे माजी क्रिकेटर नवज्योत सिद्धू आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आताही त्यांनी शेतकरी आंदोलन आणि त्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपल्या खास शेरोशायरीच्या अंदाजात भाष्य केलंय. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी शेतकरी आंदोलनातील आंदोलकांवर होणाऱ्या टीकेचा समाचार घेतलाय. श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का? असा थेट सवाल नवज्योत सिद्धू यांनी केलाय (Navjot Singh Sidhu hits Modi government over Farmers Protest in a poetic tweet).

नवज्योत सिद्धू यांच्या या शेरवर त्यांच्या फॉलोवर्सने जोरदार प्रतिसाद देत त्यांचं कौतुक केलंय. तर त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्या या ट्विटवर टीका केली. असं असलं तरी प्रत्येक जण सिद्धू यांच्या ट्विटचा अर्थ आपआपल्या समजेनुसार लावत आहे आणि त्याची प्रशंसा किंवा टीका करत आहे.

एका युजरने या ट्विटवर कमेंट करताना अभिनेता अक्षय कुमारवर निशाणा साधला. त्याने लिहिलं, “चित्रपटात शिखांची भूमिका करताना सिंहाप्रमाणे ओरडत होते. मागील दीड महिन्यापासून शेतकरी आंदोलनात 100 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय तेव्हा कुणीही बोलले नाही. परदेशींनी यावर प्रतिक्रिया दिली तर अचानक हे भारत-भारत करत सरकारचे पाळीव कुत्रे होऊन शेपूट हलवायला लागले.”

त्यामुळे सोशल मीडियावर या ट्विटची जोरदार चर्चा सुरु आहे. सिद्धू यांनी याआधी देखील अनेकदा कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रत्येकवेळी त्यांनी मोदी सरकारची कोंडी केलीय. याआधी सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या शंकांवर अभ्यास करण्यासाठी एक समिती तयार केली होती. त्यावरही सिद्धू यांनी आक्षेप घेतला होता. लोकशाहीत कायदा करण्याचे अधिकार लोकप्रतिनिधी आणि संसदेला असते, न्यायालयाला किंवा कमिट्यांना नाही. त्यामुळे कोणतीही मध्यस्थता, चर्चा शेतकरी आणि संसदेमध्ये व्हावी, असं मत सिद्धू यांनी त्यावेळी व्यक्त केलं होतं.

दरम्यान, सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत तब्बल 11 चर्चेच्या फेऱ्या झाल्यात. 22 जानेवारीला या चर्चेची शेवटची फेरी झालीय. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे केंद्र सरकार देखील माघार घेताना दिसत नाहीये.

हेही वाचा :

इतिहासाकडून शिकला नाही, तर त्या घटनांची पुनरावृत्ती होते, नवज्योत सिंग सिद्धूंचा इशारा

राजा इतना भी फकीर मत चुनो… दीड वर्षांनी पुन्हा त्याच वाक्याचा दाखला, सिद्धूंचा मोदींवर निशाणा

नवज्योत सिंग सिद्धू यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

व्हिडीओ पाहा :

Navjot Singh Sidhu hits Modi government over Farmers Protest in a poetic tweet

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.