Navneet Rana: याद राखा, मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा सुपरहिट होता, आता राज ठाकरे हिट ठरले तर…; नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले

Navneet Rana: मुख्यमंत्र्यांनी कालच्या रॅलीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ब्र शब्द काढला नाही. राज्यातील भारनियमावर भाष्य केलं नाही. अडिच वर्ष तर घरातून बाहेरच पडले नाही.

Navneet Rana: याद राखा, मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा सुपरहिट होता, आता राज ठाकरे हिट ठरले तर...; नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले
आता राज ठाकरे हिट ठरले तर...; नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 12:22 PM

नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कालच्या मुंबईतील सभेतून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी मुन्नाभाई असा केला होता. शाल अंगावर घेतल्याने कुणी बाळासाहेब होत नसतं, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी जोरदार टीका केली आहे. मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा गाजला होता. संजय दत्तच्या स्वप्नात गांधी येत होते. राज ठाकरेंच्या बाबतीत तसंच झालं. तर मुन्नाभाई एमबीबीएस सारखे राज ठाकरे सुपरहिट होतील. तुम्ही आधीच फ्लॉप आहात. अजून तुमचं डिझास्टर होईल, असा हल्लाबोल नवनीत राणा यांनी केला. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक मुद्द्याचं खंडन केलं. हनुमान चालिसा वाचणाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करता. आमच्या घरावर हल्ला करता. त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करता. हीच का तुमची कायदा सुव्यवस्था आहे का? असा सवाल आमदार रवी राणा यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी कालच्या रॅलीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ब्र शब्द काढला नाही. राज्यातील भारनियमावर भाष्य केलं नाही. अडिच वर्ष तर घरातून बाहेरच पडले नाही. विदर्भातील एकाही गावात अजूनपर्यंत दौरा का केला नाही? कालच्या भाषणात बेरोजगारी दूर करण्याबाबतचं जराही भाष्य केलं नाही. हाताला काम दिलं. फक्त एवढंच त्यांनी सांगितलं. कुठे काम दिलं? या उलट फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तीनपट रोजगार वाढवले. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात किती रोजगार दिले याचा डेटा तुम्ही काढून पाहू शकता, असं नवनीत राणा म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

सरकार पडेल म्हणून ते भाष्य

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा हा शिवसेनेचाच अजेंडा होता. काल संभाजी महाराजांची जयंती होती. मात्र, तुम्ही भाषणात म्हणालात औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर करण्याची गरज काय? तुम्हीच तसं म्हणू शकता. कारण औरंगाबादचं नाव संभाजी नगर करायला गेल्यास तुमच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला जाईल हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळेच औरंगाबादच्या नामांतराची गरज नसल्याची भाषा तुमच्या तोंडी आली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

तर महाराष्ट्रात हनुमान चालिसा का म्हणून शकत नाही?

हनुमाना चालिसा म्हणायचा असेल तर काश्मीरला जा असं तुम्ही म्हणता. मी जर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी काश्मीरमध्ये जाऊ शकते. तर महाराष्ट्रात का हनुमान चालिसा म्हणू शकत नाही? तुम्ही जसे महाराष्ट्राचे सुपुत्रं आहात. तशीच मी महाराष्ट्राची कन्या आहे, असंही त्या म्हणाल्या.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.