नवनीत राणा यांच्या पत्राची राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडून दखल, 2 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार?

नवनीत राणा यांच्या पत्राची आता राष्ट्रीय अनुसूचित आयोगानेही दखल घेतली आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्त आरती सिंग आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा यांच्या पत्राची राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडून दखल, 2 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार?
नवनीत राणा, खासदारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 1:59 PM

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुंबई आणि अमरावतीच्या पोलिसांसह सहा जणांविरोधात संसदेत हक्कभंग दाखल केला होता. संसदेनं हा हक्कभंग दाखल करुन घेत मुंबई, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांसह (Mumbai, Amravati Police Commissioner) या सहाही जणांना संसदेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सर्वांना आता संसदेत उपस्थित राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे. यानंतर आता नवनीत राणा यांच्या पत्राची आता राष्ट्रीय अनुसूचित आयोगानेही दखल घेतली आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्त आरती सिंग आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सिंग आणि ठाकरे यांनी राणा यांच्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या बैठकीनंतर आता अॅट्रॉसिटी (Atrocity) अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठीच आमच्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्याविरोधात तर मी ईडी आणि सीबीआयकडेही धाव घेणार आहे. आरती सिंग यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं असून सिंग या निलंबित होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला आहे.

‘कुणावरही अन्याय होऊ नये’

आज माझ्यावर अन्याय झाला. उद्या आणखी कुणावर होईल. इतर कुणावरही असा अन्याय होऊ नये म्हणून हक्कभंग दाखल केला आहे. आरती सिंग त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यांना सस्पेंड करेपर्यंत मी शांत बसणार नाही. सीबीआय आणि ईडीमध्ये जाणार आहे. या मॅडम ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंगवर होत्या तिथल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. मी घोटाळ्याची माहिती काढली आहे. महाराष्ट्रात येणं आणि लोकप्रतिनिधीसोबत असा व्यवहरा करणं हे खपवून घेतलं जात नाही हे दाखवण्यासाठी मी लढत आहे, असं राणा यांनी म्हटलंय.

आमदार रवी राणांचाही आरोप

आमदार रवी राणा यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. सीपी आरती सिंग यांनी 307, 353 सारखे खोटे गुन्हे माझ्याविरोधात दाखल केले. मी दिल्लीत असताना गुन्हा दाखल केला. वरून दबाव असल्याचं कारण दिलं. अनेक लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली. मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी बदनामी केली जात असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय.

इतर बातम्या : 

ED Raid : ‘आमच्याकडे मसाला तयार, आम्ही दणका देणार’, ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा थेट इशारा; भाजपवर हल्लाबोल

Lonikar Audio Clip : बबनराव लोणीकरांचा पाय खोलात? ऑडिओ क्लिप प्रकरणात चौकशी सुरु, अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.