जडेजा घरातील ननंद-भावजय 2024 मध्ये पुन्हा एकमेकींना भिडणार, काँग्रेस पक्षाने घेतला मोठा निर्णय!
दोन्ही ननंद आणि भावजय आता परत भिडताना दिसणार आहेत. नयनबा जडेजा यांची ताकद आणखी वाढली आहे.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजाची पत्नी आयपीएलच्या फायनल सामन्यानंतर चर्चेत आली होती. रिवाबा असं जडेजाच्या पत्नीचं नाव असून त्या गुजरातमध्ये आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. रविंद्र जडेजाची बहिण नयनाबा जडेजाला त्यांनी पराभूत केलं होतं. अशातच दोन्ही ननंद आणि भावजय आता परत भिडताना दिसणार आहेत. नयनबा जडेजा यांची ताकद आणखी वाढली आहे.
काँग्रेस पक्षाच्या नेत्या असलेल्या नयनबा यांच्यावर पक्षाने मोठी जबबादारी दिली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. राजकोट शहर आणि जिल्हा सेवा दलाचे प्रमुख म्हणून नयनबा यांची निवड केली आहे. नयनबा यांनी फेसबुक पोस्ट करत सेवा दलाचे मुख्य संघटक लालजी देसाई यांचे आभार मानले आहेत.
रिवाबा जडेजा आणि नयनबा जडेजा 2022 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये एकमकींना भिडल्या होता. जडेजा घरातील ननंद आणि भावजय यांच्यामध्ये रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाने विजय मिळवला होता. मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमध्ये आता परत एकदा दोन्ही ननंद-भावजय प्रचारात उतरणार आहेत.
दरम्यान, जिल्हा सेवा दलाच्या प्रमुखपदी निवड झाल्यावर आपण संघटना वाढवण्यासाठी जोरदार काम करणार असल्याचं नयनबा जडेजा म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसने नयनबा यांच्यावर विश्वास ठेवला असूनल राजकोटमध्ये संघटना आणि पक्ष वाढवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.