Sharad Pawar: संख्याबळ आहे तर बंडखोर आसामला का बसले?, मुंबईत येऊन राज्यपालांकडे दावा का करत नाही?; पवारांचा सवाल

बंडखोर आमदारांच्या या भूमिकेला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी, सीपीएमआणि तृणमूल काँग्रसे या पक्षांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा नाही मग राहिला कोणता पक्ष असं म्हणत भाजपचे नाव न घेता त्यांनी भाजपकडे बोट दाखवले.

Sharad Pawar: संख्याबळ आहे तर बंडखोर आसामला का बसले?, मुंबईत येऊन राज्यपालांकडे दावा का करत नाही?; पवारांचा सवाल
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 8:12 PM

नवी दिल्लीः राज्यातील विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Rebel MLA Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेतीलच काही आमदारांना फोडले. मुंबई, सूरत आणि नंतर गुवाहाटी असा राजकीय प्रवास करणाऱ्या बंडखोर आमदारांबद्दल आज शरद पवारांनी (NCP Leader Sharad Pawar) काही सवाल उपस्थित केले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीबाबत (President election) दिल्लीला गेलेले शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती देताना बंडखोर आमदारांबद्दल म्हणाले की, बंडखोर आमदारांचे संख्याबळ आहे तर मग बंडखोर आमदार आसामला जाऊन का बसले आहेत.

त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर त्यांनी मुंबईत येऊन राज्यपालाकडे दावा का करत नाहीत असा सवालही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केला.

राष्ट्रवादीचा आताच का त्रास

अडीच वर्ष ते आमच्यासोबत होते. राष्ट्रवादीसोबत होते. अडीच वर्षात राष्ट्रवादीचा त्रास झाला नाही. आता का झाला आहे. ही केवळ कारण आहे. स्वताला डिफेन्ड करण्यासाठी यावेळी शरद पवार यांनी सांगितले की, आमदार घेऊन जाण्यासाठी जी राज्ये निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये गुजरात आणि आसाम यांची निवड केली गेली आहे. त्या राज्यातून सत्ता कुणाची आहे, तर भाजपची आहे. असे असले तरी भाजप या प्रवास कुठपर्यंत आहे मला माहिती नाही असंही त्यांनी सांगितले.

बंडखोरांना राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा

बंडखोर आमदारांच्या या भूमिकेला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी, सीपीएमआणि तृणमूल काँग्रसे या पक्षांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा नाही मग राहिला कोणता पक्ष असं म्हणत भाजपचे नाव न घेता त्यांनी भाजपकडे बोट दाखवले.

आमची भूमिका स्पष्ट

यावेळी शरद पवार यांनी आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडताना सांगितले की, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असून आमची कमिटमेंट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत असल्याचेही स्पष्ट केले.

हे फिक्सिंग आहे का?

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल आता काही सवालही उपस्थित करण्यात येत आहेत. बंडखोरी नाट्य हे ठरलेले नाट्य आहे अशी टीकाही शिवसेनेवर केली जात आहे. त्यामुळे पत्रकारांनी त्यांना ही मॅच फिक्सिंग आहे का अंस विचारल्यानंतर त्यावेळी शरद पवार यांनी सांगितले की, मॅच फिक्सिंग असेल तर एवढ्या चर्चा आम्ही कशासाठी केली असती. शिवसेना कशासाठी मेहनत करत आहे. आज मुंबईत शिवसेनेचे आक्रमकपणे मेळावे होते आहे. आज चार ठिकाणी मोठे मेळावे होत असल्याचे सांगत अनेक जिल्ह्यात मेळावे होत आहेत असंही त्यांनी सांगितले.

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.