Narendra Modi : काँग्रेसला 10 वर्षानंतरही 100 चा आकडा गाठता आला नाही, तीन निवडणुकांचे आकडे…; नरेंद्र मोदी यांची डिवचले

NDA Alliance Meeting LIVE : एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला त्यांच्या कामगिरीविषयी आरसा दाखवला. गेल्या तीन निवडणुकीतील आकड्यांच्या आधारे काँग्रेसला 100 चा आकडा सुद्धा गाठता आले नसल्याचा चिमटा मोदींनी काढला.

Narendra Modi : काँग्रेसला 10 वर्षानंतरही 100 चा आकडा गाठता आला नाही, तीन निवडणुकांचे आकडे...; नरेंद्र मोदी यांची डिवचले
काँग्रेसला नरेंद्र मोदींनी दाखवला आरसा
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 2:13 PM

NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी विविध विषयावर मतं व्यक्त केले. एनडीएची दिल्लीत बैठक सुरु आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला. ईव्हीएमपासून ते लोकशाही प्रक्रियेवर अविश्वास निर्माण केल्याप्रकरणात त्यांनी काँग्रेसला धो-धो धुतले. त्याचवेळी काँग्रेसला त्यांनी निवडणुकीतील कामगिरीवरुन आरसा पण दाखवला. काँग्रेसला 100 चा आकडा सुद्धा गाठता आले नसल्याचा चिमटा मोदींनी काढला.

लोकशाहीला कमी लेखण्याचे काम

जगात भारताची लोकशाही कमी लेखण्याचं काम करत आहेत. मी जगात भारत ही लोकशाहीची जननी असल्याचं सांगतोय आणि हे तिकडे लोकशाही बदनाम करायचं काम करत आहे. हा चहावाला गडबड करून आलाय असं सांगत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी काँग्रेसवर केला.

हे सुद्धा वाचा

देशात फुट पाडण्याचे काम

१ तारखेला मतदान झाले. ४ तारखेला मतमोजणी झाली. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी पाहा. या काळात देशात हिंसा घडवण्याची भाषा केली जात होती. काही लोक गंभीर घेत नाहीत. निकाल आल्यावर देशात आग लागेल अशा पद्धतीने काम केलं. देशातील लोकांना विभागणअयाचं काम केलं. लोकांना तोडण्याचं काम केलं. देशात फूट पाडण्याचं काम केलं, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. २०२४च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर हे निकाल एनडीएचा महाविजय आहे, हेच लोक सांगतील. जगही हे मान्य करेल.

आम्ही हरलो नाही

पण देशाला माहीत आहे.आम्ही हरलो नव्हतो आणि हरलो नाही. पण ४ तारखेला जो व्यवहार राहिला आहे. आपण विजय पचवू शकतो हे आपण दाखवून दिलं. आपले संस्कार असे आहेत. विजयाच्या उन्माद करू नये, पराजित लोकांचा उपहास करण्याची आपली संस्कृती नाही. आपण विजय पचवतो. हे आपले संस्कार आहे, असे मोदी म्हणाले.

काँग्रेसला असा दाखवला आरसा

लोकसभेपूर्वी सरकार कुणाचं होतं. २०२४च्या निकालानंतर कुणाचं सरकार बनलं तर लहान मूलही सांगेल एनडीएचं सरकार होतं. मग हारलो कसं. पूर्वीही एनडीए होती आणि आताही. दहा वर्षानंतरही काँग्रेसला १००चा आकडा गाठता आला नाही. २०१४, २०१९ आणि २०२४मधील काँग्रेसचे तीन निवडणुकीतील जागा एकत्र केल्या तर त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलो आहोत. ते आधी हळूहळू बुडत होते. आता वेगाने बुडणार आहेत.

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.