Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : एनडीएच्या विजयाचा मूलमंत्र काय?; मोदी म्हणाले, जिथे कमी, तिथे…

NDA Alliance Meeting LIVE : एनडीएच्या विजयाचा मूलमंत्र काय? तिसऱ्यांदा बहुमताची माळ एनडीएच्या गळ्यात पडली आहे. यामागे कारण काय असेल याची चर्चा आहे. मोदींची एनडीएची नेते म्हणून निवड झाली. त्यावेळी त्यांनी त्याचे उत्तर दिले.

Narendra Modi : एनडीएच्या विजयाचा मूलमंत्र काय?; मोदी म्हणाले, जिथे कमी, तिथे...
नरेंद्र मोदी यांचा विजयाचा मूलमंत्र काय?
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 1:54 PM

एनडीएने पुन्हा एकदा बहुमताला गवसणी घातली. एनडीएच्या गळ्यात विजयाची माळ पडली. भाजपच्या नेतृत्वातील लोकशाही आघाडीची दिल्लीत बैठक सुरु आहेत. यामध्ये एनडीएच्या नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली. त्यावेळी मोदींनी अनेक विषयाला थेट हात घातला. एनडीएला विजय कशामुळे मिळाला हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या विजयाचे विश्लेषण केले. त्यांनी एनडीएतील सर्व घटक पक्ष आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

विश्वासाचा पूल मजबूत

ज्या लाखो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. त्यांनी दिवस पाहिला नाही. रात्र पाहिली नाही. प्रचंड उन्हात प्रत्येक दलाच्या कार्यकर्त्याने जे परिश्रम केले आहे, त्यांना मी मान झुकवून नमन करतो. २०१९ मध्ये मी या सभागृहात बोलत होतो. तुम्ही नेता म्हणून मला निवडलं होतं. त्यावेळी मी विश्वास या शब्दावर जोर दिला होता. तुम्ही आज मला पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. याचा अर्थ आहे की आपल्या दोघांमध्ये विश्वासाचा पूल मजबूत आहे. हे अतूट नातं विश्वासाच्या आधारावर आहे. ही सर्वात मोठी कमाई आहे. त्यामुळेच हा क्षण माझ्यासाठी भावूक करणारा असल्याचे मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गुड गव्हर्न्सचा मोठा सहभाग

दहा वर्षात विकास करणार. गुड गव्हर्न्स देणार. मध्यम वर्ग आणि उच्च मध्यमवर्गाच्या जीवानातील सरकारचा हस्तक्षेप जेवढा कमी होईल, तेवढी लोकशाही मजबूत होईल असं माझं मत आहे. आज तंत्रज्ञानाच्या युगात आपण सहजपणे ते करू शकतो. आपल्याला बदल हवा आहे. गुड गव्हर्न्सचा हा महत्त्वाचा भाग आहे. विकासाचा नवा अध्याय लिहू. जनतेच्या भागिदारीचा अध्याय लिहू. विकसित भारताचं स्वप्न साकार करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

कशामुळे मिळाला विजय

सभागृहात कोणत्याही पक्षाचा कोणीही लोकप्रतिनिधी असेल तर तो माझ्यासाठी सर्व समान आहे. मी सभागृहातही लोकसभा असो की राज्यसभा असो आमच्यासाठी सर्व समान आहे. त्यामुळेच एनडीए ३० वर्षापासून मजबुतीने पुढे गेला आहे. आपला परका कोणी नाही. सर्वांना आम्ही जवळ घेतलं आहे. आम्ही २०२४मध्ये या टीम भावनेने काम केलं आणि ग्रासरुट लेव्हलपर्यंत काम केलं, त्यामध्येच आपल्याला आर्गेनिक अलायन्सचं सामर्थ्य दिलं आहे. एक दुसऱ्यांची मदत केली आहे. जिथे कमी तिथे आम्ही हाच विचार आम्ही केला. काही कमी असेल तर मी येईल, काही कमी पडू देणार नाही. जिथे कमी तिथे आम्ही असं कार्यकर्ते जगले. त्यामुळे तर विजय मिळाला, असे त्यांनी स्पष्ट केले.

'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले.
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?.
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....