नवी दिल्ली : देशात कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाने (health department) चिंता व्यक्त केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मागच्या चोवीस तासात रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागच्या चोवीस तासात 5,880 कोरोना रुग्ण सापडले आहेत. सध्या देशात 35,199 कोरोना रुग्णांची संख्या आहे. मागच्या तीन वर्षात कोरोनाला रोकण्यासाठी केंद्र सरकारकडून लसीकरण (vaccination from the central government) करण्यात आलं होतं.
कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात आतापर्यंत 220.66 कोटी लस नागरिकांना देण्यात आल्या. सुध्या कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाने पुन्हा चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात 205 डोस देण्यात आले आहेत.
लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे, त्याचबरोबर वारंवार हात धुणे या गोष्टींची सुचना केली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहीमेअंतर्गत आतापर्यंत 220.66 करोड लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे. 95.21 करोड लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 22.87 कोटी प्रतिबंधात्मक डोस दिले आहेत.त्याचबरोबर मागच्या 24 तासांमध्ये 205 डोस देण्यात आले आहेत.
आकड्यांवरुन सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 98.73 टक्के आहे. मागच्या 24 तासात 3,481 लोकं आतापर्यंत कोरोनामुक्त झाली आहेत. देशात कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,96,318 इतकी आहे. दिवसाला कोरोना रुग्ण
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मागच्या चोवीस तासात 85,076 टेस्ट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 92.28 करोड लोकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पुर्वी ज्या पद्धतीने काळजी घेतली जात होती. त्याचपद्धतीने काळजी घ्यावी असं आरोग्य विभागाने जाहीर केलं आहे.