Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, आकडे दोन लाखांच्या वर, कोरोनाबळीही 4100 पार

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 71 लाख 57 हजार 795 वर गेला आहे. (Corona Cases in India)

Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, आकडे दोन लाखांच्या वर, कोरोनाबळीही 4100 पार
Corona
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 10:04 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases in India) सलग चार दिवस घट झाल्यानंतर किंचितशी वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 12 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 8 हजार 921 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली गेली होती, परंतु पुन्हा एकदा हा आकडा वाढला आहे. कालच्या दिवसात 4 हजार 157 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले, त्याचप्रमाणे कोरोनाबळींच्या संख्येतही वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे लसीकरण झालेल्या नागरिकांच्या संख्येने वीस कोटींचा आकडा ओलांडला आहे (New 208921 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 8 हजार 921 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 157 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 95 हजार 955 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 71 लाख 57 हजार 795 वर गेला आहे. देशात 2 कोटी 43 लाख 50 हजार 816 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 11 हजार 388 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 24 लाख 95 हजार 591 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 20 कोटी 6 लाख 62 हजार 456 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,08,921

देशात 24 तासात डिस्चार्ज – 2,95,955

देशात 24 तासात मृत्यू – 4,157

एकूण रूग्ण – 2,71,57,795

एकूण डिस्चार्ज – 2,43,50,816

एकूण मृत्यू – 3,11,388

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 24,95,591

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 20,06,62,456 (Corona Cases in India)

संबंधित बातम्या :

Corona Virus | कोरोनावरील उपचारांसाठी अँटीबॉडी कॉकटेल, डोसपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या या औषधाबद्दल सर्व काही

Sputnik V लसीची कमतरता संपणार, ‘ही’ कंपनी भारतातच करणार उत्पादन

(New 208921 Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.