Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, कोरोनाबळींच्या संख्येत मात्र घट

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता तब्बल 2 कोटी 73 लाख 69 हजार 93 वर गेला आहे. (Corona Cases 24 hours)

Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, कोरोनाबळींच्या संख्येत मात्र घट
Corona
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 10:05 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases in India) सलग चार दिवस घट झाल्यानंतर किंचितशी वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 3 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 11 हजार 298 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली गेली होती, परंतु पुन्हा एकदा हा आकडा वाढताना दिसत आहे. कालच्या दिवसात 3 हजार 847 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले, मात्र कोरोनाबळींच्या संख्येत घट झाल्याने काहीसा दिलासा मानला जात आहे. (New 211298 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 11 हजार 298 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 847 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 83 हजार 135 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 73 लाख 69 हजार 93 वर गेला आहे. देशात 2 कोटी 46 लाख 33 हजार 951 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 15 हजार 235 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 24 लाख 19 हजार 907 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 20 कोटी 26 लाख 95 हजार 874 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,11,298

देशात 24 तासात डिस्चार्ज – 2,83,135

देशात 24 तासात मृत्यू – 3,847

एकूण रूग्ण – 2,73,69,093

एकूण डिस्चार्ज – 2,46,33,951

एकूण मृत्यू – 3,15,235

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 24,19,907

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 20,26,95,874 (Corona Cases 24 hours)

संबंधित बातम्या :

पुण्यातील भारत बायोटेकच्या प्लांटची वेगाने उभारणी; शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या भरतीला लवकरच सुरुवात

“खोकला, शिंकणे किंवा बोलल्यानं कोरोना हवेत पसरतो”, केंद्राने नियमावली बदलली, वाचा नवे नियम

(New 211298 Corona Cases in India in the last 24 hours)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.