Corona Cases in India | देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत 17 हजारांनी घट, मात्र कोरोनाबळी पुन्हा वाढले
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 वर गेला आहे. ( Corona Cases in India 24 hours)
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. (Corona Cases in India) सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर काहीशी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 17 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 59 हजार 591 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. कालच्या दिवसात 4 हजार 209 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. (New 259591 Corona Cases in India in the last 24 hours)
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 59 हजार 591 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 209 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 295 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 वर गेला आहे. देशात 2 कोटी 27 लाख 12 हजार 735 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 91 हजार 331 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 30 लाख 27 हजार 925 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 18 लाख 79 हजार 503 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,59,591
देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,57,295
देशात 24 तासात मृत्यू – 4,209
एकूण रूग्ण – 2,60,31,991
एकूण डिस्चार्ज – 2,27,12,735
एकूण मृत्यू – 2,91,331
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 30,27,925
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 19,18,79,503 ( Corona Cases in India 24 hours)
India reports 2,59,591 new #COVID19 cases, 3,57,295 discharges & 4,209 deaths in last 24 hrs, as per Health Ministry.
Total cases: 2,60,31,991 Total discharges: 2,27,12,735 Death toll: 2,91,331 Active cases: 30,27,925
Total vaccination: 19,18,79,503 pic.twitter.com/ehndKtsQ7n
— ANI (@ANI) May 21, 2021
संबंधित बातम्या :
कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात, ICMR प्रमुखांचा दावा
(New 259591 Corona Cases in India in the last 24 hours)