Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर

गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 62 हजार 727 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (New Corona Cases in India)

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर
Corona
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 9:35 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास 14 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 3 लाख 62 हजार 727 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 120 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे (New 362727 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या आठवड्यात 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 62 हजार 727 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 120 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 52 हजार 181 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 37 लाख 3 हजार 665 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 58 हजार 317 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात 1 कोटी 97 लाख 34 हजार 823 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37 लाख 10 हजार 525 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 72 लाख 14 हजार 256 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 3,62,727

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,52,181

देशात 24 तासात मृत्यू – 4,120

एकूण रूग्ण – 2,37,03,665

एकूण डिस्चार्ज – 1,97,34,823

एकूण मृत्यू – 2,58,317

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण –  37,10,525

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 17,72,14,256

संबंधित बातम्या :

आणखी एका नव्या औषधासाठी चार कंपन्या एकत्र, कोरोना रुग्ण लवकर ठीक होत असल्याचा दावा

(New 362727 Corona Cases in India in the last 24 hours)

सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार.
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.