CDS : देशाचे नवे सीडीएस कोण होणार? केंद्राकडून नियुक्तीबाबत तातडीने हलचाली सुरू

हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) रावत यांचा मृत्यू झाल्यापासून हे पद रिक्त आहे. आता मोदी सरकारने सैन्याच्या तिन्ही दलाचे नेतृत्व करण्यासाठी नवीन सीडीएसचा (New CDS Of India) शोध सुरू केला आहे.

CDS : देशाचे नवे सीडीएस कोण होणार? केंद्राकडून नियुक्तीबाबत तातडीने हलचाली सुरू
देशाचे नवे सीडीएस कोण होणार? केंद्राकडून नियुक्तीबाबत तातडीने हलचाली सुरूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 8:40 PM

नवी दिल्ली : सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्या मृत्युनंतर देशाला अजूनही नव्या सीडीएस अधिकाऱ्याची प्रतीक्षा लागली आहे. हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) रावत यांचा मृत्यू झाल्यापासून हे पद रिक्त आहे. आता मोदी सरकारने सैन्याच्या तिन्ही दलाचे नेतृत्व करण्यासाठी नवीन सीडीएसचा (New CDS Of India) शोध सुरू केला आहे. यासाठी सरकार उत्तम अधिकाऱ्यांच्या शोधात आहे. सेवेतील यामध्ये निवृत्त आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नावांचाही विचार केला जात आहे. लवकरच सरकार नवीन सीडीएसचे नाव निश्चित करेल, असेही सांगण्यात येत आहे. 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूमध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात देशाने तत्कालीन CDS जनरल बिपिन रावत यांना गमावले होते. त्या अपघातात जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह 12 जवानांना प्राण गमवावे लागले. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जनरल रावत यांच्याकडे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना देशातीचे पहिले सीडीएस बनवण्यात आले.आता सरकार देशाच्या दुसऱ्या सीडीएसच्या शोधात आहे.

याच आठवड्यात घोषणा होणार?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार या पदासाठी सेवेत कार्यरत आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या नावावर विचार करू शकते. इंडिया टुडे या वृत्त संस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार या आठवड्यात लष्करप्रमुखांबाबत घोषणा करणार आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या पदावर नियुक्तीसाठी सेवेतील आणि सेवानिवृत्त दोन्ही अधिकारी विचारात घेतले जाऊ शकतात. अधिकारी लेफ्टनंट जनरल किंवा लष्करप्रमुख अशा दोन्ही रॅकमधील असू शकतात. मराठमोळे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचेही नाव या पदासाठी चर्चेत होते.

लष्करातील सर्वात मोठे पद

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे पद हे लष्करातील सर्वात मोठ्या पदांपैकी एक आहे आणि त्यामुळे सरकार आणि संरक्षण दलांच्या कामकाजात अधिक समन्वय निर्माण झाला आहे. आधुनिकीकरण प्रकल्प, पदोन्नती इत्यादींना मान्यता देण्यासाठी देशातील संरक्षण दल पूर्वी नोकरशाहीतून जात असे, परंतु लष्करी व्यवहार विभाग स्थापन झाल्यापासून ही सर्व कामे लष्कराच्या अखत्यारीत आली. तिन्ही दलांमधील लष्करी मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्याचे कामही सीडीएसला देण्यात आले आहे. थिएटर कमांड सारख्या नवीन युगातील युद्धापासून ते सशस्त्र दलांच्या शस्त्रास्त्रांच्या स्वदेशीकरणाची जबाबदारी देखील CDS वर आहे. त्यामुळे या पदाला सर्वात जास्त महत्व आहे.

Kanhaiya Kumar : बिहार काँग्रेसची कमान कन्हैया कुमार यांच्याकडे? अध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोण कोण?

Assam : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आसामला, 14 जणांचा मृत्यू, आणखी 5 दिवस धोक्याचेच

Jahangirpuri Violence : हिंसाचारानंतर दिल्लीला छावणीचे स्वरूप; जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी आणखी 5 CRPF कंपन्या दिल्लीला रवाना

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.